AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded Crime : साधा पाणीपुरी विकणारा निघाला अट्टल… धंद्याच्या आड काळेधंदे; नांदेडमध्ये काय घडलं?

नांदेडमध्ये पाणीपुरी विकणाऱ्या इसमाने असं मोठं कांड केलंय जे ऐकून तुमची भीतीने गाळणच उडेल. एक साधासुधा, पाणीपुरी विकणाऱ्या माणसाचे कारनामे ऐकून सगळेच अवाक झाले. साध्यासुध्या चेहऱ्यामागे असं काम करणारा माणूस असेल असं कोणालाच वाटलं नव्हतं.

Nanded Crime : साधा पाणीपुरी विकणारा निघाला अट्टल... धंद्याच्या आड काळेधंदे; नांदेडमध्ये काय घडलं?
| Updated on: Sep 23, 2023 | 3:00 PM
Share

नांदेड | 23 सप्टेंबर 2023 : रस्त्यावरचे काही पदार्थ इतके चविष्ट असतात की ते रोज खाल्ले तरी मन तृप्त होत नाही. त्यापैकीच एक म्हणजे पापु… आपली पाणीपुरी हो ! ज्याचा भारतातील लोक मोठ्या आनंदाने आस्वाद घेतात. पोट जरी भरले तरी पाणीपुरीसाठी (panipuri) प्रत्येकाच्या पोटात थोडी तरी जागा असतेच. उकडलेले चणे (रगडा), बटाटे (potato) आणि आंबट , गोड, मसालेदार पाण्याने भरलेली पुरी तोंडात जाताच, मन तृप्त होतं. ही केवळ तरुणांनाच नव्हे तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वानांच खायला (likes eating) आवडते. पाणीपुरी विकणाऱ्याचे दुकानही प्रत्येकाचे ठरलेले असते. त्या भय्याच्या हातची पाणीपुरी खाऊन समाधान होतं. पण हीच पाणीपुरी आता धोकादायक ठरू शकते.

का म्हणून का विचारताय, नांदेडमध्ये पाणीपुरी विकणाऱ्या इसमाने असं मोठं कांड केलंय जे ऐकून तुमची भीतीने गाळणच उडेल. एक साधासुधा, पाणीपुरी विकणारा माणूस अट्टल गुन्हेगार (crime news) निघाला. पाणीपुरी व्यवसायाच्या नावाखाली तो चक्क गावठी कट्टा म्हणजे पिस्तुल ( selling gun ) विकत होता की ओ ! हो, हे अगदी खरं आहे आणि त्या भामट्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याचा खरा चेहरा उघड झाला. पोलिसांनी त्याच्याकडून दोन गावठी कट्टे आणि पाच जिवंत काडतूस जप्त केले आहेत.

पाणीपुरीच्या नावाखाली विकत होता गावठी कट्टा

संजय परिहार अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मध्यप्रदेश राज्यातील बिल्हेटी येथील रहिवासी आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो भोकर येथे पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करायचा. मात्र हा आरोपी नवीन मोंढा परिसरात गावठी कट्टे आणि काडतूस विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना शुक्रवारी मिळाली. त्यांनी तत्काळ कारवाई करत त्या इसमास लगेच ताब्यात घेतले आणि त्याची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे दोन गावठी कट्टे ( पिस्तुल) आणि पाच जिवंत काडतुसं सापडली.

आरोपी हा पाणीपुरीच्या व्यवसायाच्या नावाखाली लपूनछपून हत्यारं विकायचा. तो मध्यप्रदेश मधून गावठी कट्टे आणायचा आणि नांदेडमध्ये विक्री करायचा. यामागे मोठी टोळी कार्यरत असून पोलीस त्या दृष्टीने तपास करताहेत अशी माहिती पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांनी दिली

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.