
नांदेड | 23 सप्टेंबर 2023 : रस्त्यावरचे काही पदार्थ इतके चविष्ट असतात की ते रोज खाल्ले तरी मन तृप्त होत नाही. त्यापैकीच एक म्हणजे पापु… आपली पाणीपुरी हो ! ज्याचा भारतातील लोक मोठ्या आनंदाने आस्वाद घेतात. पोट जरी भरले तरी पाणीपुरीसाठी (panipuri) प्रत्येकाच्या पोटात थोडी तरी जागा असतेच. उकडलेले चणे (रगडा), बटाटे (potato) आणि आंबट , गोड, मसालेदार पाण्याने भरलेली पुरी तोंडात जाताच, मन तृप्त होतं. ही केवळ तरुणांनाच नव्हे तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वानांच खायला (likes eating) आवडते. पाणीपुरी विकणाऱ्याचे दुकानही प्रत्येकाचे ठरलेले असते. त्या भय्याच्या हातची पाणीपुरी खाऊन समाधान होतं. पण हीच पाणीपुरी आता धोकादायक ठरू शकते.
का म्हणून का विचारताय, नांदेडमध्ये पाणीपुरी विकणाऱ्या इसमाने असं मोठं कांड केलंय जे ऐकून तुमची भीतीने गाळणच उडेल. एक साधासुधा, पाणीपुरी विकणारा माणूस अट्टल गुन्हेगार (crime news) निघाला. पाणीपुरी व्यवसायाच्या नावाखाली तो चक्क गावठी कट्टा म्हणजे पिस्तुल ( selling gun ) विकत होता की ओ ! हो, हे अगदी खरं आहे आणि त्या भामट्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याचा खरा चेहरा उघड झाला. पोलिसांनी त्याच्याकडून दोन गावठी कट्टे आणि पाच जिवंत काडतूस जप्त केले आहेत.
पाणीपुरीच्या नावाखाली विकत होता गावठी कट्टा
संजय परिहार अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मध्यप्रदेश राज्यातील बिल्हेटी येथील रहिवासी आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो भोकर येथे पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करायचा. मात्र हा आरोपी नवीन मोंढा परिसरात गावठी कट्टे आणि काडतूस विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना शुक्रवारी मिळाली. त्यांनी तत्काळ कारवाई करत त्या इसमास लगेच ताब्यात घेतले आणि त्याची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे दोन गावठी कट्टे ( पिस्तुल) आणि पाच जिवंत काडतुसं सापडली.
आरोपी हा पाणीपुरीच्या व्यवसायाच्या नावाखाली लपूनछपून हत्यारं विकायचा. तो मध्यप्रदेश मधून गावठी कट्टे आणायचा आणि नांदेडमध्ये विक्री करायचा. यामागे मोठी टोळी कार्यरत असून पोलीस त्या दृष्टीने तपास करताहेत अशी माहिती पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांनी दिली