AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Biyani : संजय बियाणींची हत्या खंडणी वसुलीतूनच! महाराष्ट्रासह एकूण 7 राज्यांत तपास, 6 जणांना अटक

Sanjay Biyani Murder Case : सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड व पोलीस छाणे विमानतळ यांचे नाफतीने तपास करणे चालू होते. महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, तेलंगणा व कर्नाटक या राज्यात जावून तपास करण्यात आला

Sanjay Biyani : संजय बियाणींची हत्या खंडणी वसुलीतूनच! महाराष्ट्रासह एकूण 7 राज्यांत तपास, 6 जणांना अटक
संजय बियाणी हत्याकांड प्रकरणImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jun 01, 2022 | 2:06 PM
Share

नांदेड : नांदेडचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणींच्या हत्येचा (Sanjay Biyani Murder Case) उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय. या हत्येप्रकरणी एकूण सहा जणांना पोलिसांनी अटक केली असून इतरही काही आरोपींनी या हत्याप्रकरणी अटक होऊ शकते, असं नांदेड पोलिसांनी (Nanded Police) स्पष्ट केलंय. या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी महाराष्ट्रासह एकूण सहा राज्यात पोलिसांनी तपास केला. त्यानंतर या हत्येप्रकरणाचा खुलासा नांदेड पोलिसांकडून करण्यात आला. दरम्यान, संजय बियाणींच्या हत्येनंतर नांदेडमध्ये (Nanded Murder) काही जणांनी खंडणीवसुलीचा धंदा सुरु केला होता. धास्तावलेल्या बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी वसुलीचा प्रयत्न करणाऱ्यांच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. तसंच अजूनही जर कुणी खंडणीसाठी धमकावत असले, तर अशांनी पोलिसांना त्याबाबत माहिती द्यावी, असंही आवाहन करण्यात आलं आहे.

कोण कोणते गुन्हे?

दि. 5 एप्रिल 2022 रोजी नांदेड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांची मोटार सायकलवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांचे राहते घरासमोर गोळया झाडून हत्या केली होती. सदर प्रकरणात पोलिसांनी कलम 302, 307..34 भा. द. वि. सहकलम 3/25 भा. ह का प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

कुणी केला तपास?

सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र नांदेड यांचे आदेशान्वये एस आय टी ची स्थापना करण्यात आली होती. सदर एस आय टी चे प्रमुख श्री विजय कबाड़े, अपर पोलीस अधीक्षक भोकर आणि मदतीला श्री निलेश मोरे, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, पोलीस निरीक्षक श्री व्दारकादास चिखलीकर, स्थानिक गुन्हे शाखा नांदेड पोलीस निरीक्षक श्री संतोष तांबे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी व्ही माने. पी. डी. भारती, संतोष शेकडे शिवसाब घेवारे, चंद्रकांत पवार पोलीस उपनिरीक्षक दशरथ होते. गंगाप्रसाद दळवी, सचिन सोनवणे, आशिष बोराटे, दत्तात्रय काळे, गणेश गोटके असे सर्वजण होते.

सात राज्यांमध्ये तपास

तसेच सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड व पोलीस छाणे विमानतळ यांचे नाफतीने तपास करणे चालू होते. महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, तेलंगणा व कर्नाटक या राज्यात जावून तपास करण्यात आला आहे. या तपासादरम्यान आतापर्यंत सहा आरोपी निष्पन्न करुन अटक करण्यात आली आहे. यानंतरही तपासात आणखी आरोपी अटक होण्याची शक्यता आहे.

सदर गुन्ह्याच्या तपासाअंती अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं

  1. इंद्रपालसिंघ ऊर्फ सनी पि. तिरथसिंघ मेजर वय 35 वर्ष
  2. मुक्तेश्वर ऊर्फ गोलू विजय मंगनाळे वय 25 वर्ष
  3. सतनामसिंघ ऊर्फ सत्ता पि दलबिरसिंघ शेरगिल वय 28 वर्ष
  4. हरदिपसिंध ऊर्फ सोनु पिनीपाना पि. सतनामसिंध बाजवा वय 35 वर्ष
  5. गुरमुखसिंध ऊर्फ गुरी पि. सेवक वय24 वर्ष
  6. करणजितसिंघ पि. रघबिरसिंघ साहु वय 30 वर्ष सर्व रा. नांदेड यांना अटक करण्यात आली आहे.

संजय बियाणींच्या हत्याकांडानंतर या घटनेचा फायदा घेवून खंडणी वसुलीसाठी काही गुन्हेगारांनी प्रयत्न केले होते. त्यांच्या विरुद्ध स्वतंत्रपणे पोलीस ठाणे भाग्यनगर आणि विमानतळ येथे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आलीय. यानंतरही कोणाला खंडणीसाठी मागणी होत असल्यास त्यांनी पोलीस अधीक्षक नांदेड यांच्याशी संपर्क करावा, असं आवाहन करण्यात आलंय.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.