पैलवानांच्या मदतीने साडेसात किलो सोन्याची लूट…तब्बल साडेतीन कोटींचा ऐवज…चोरों का राजा नाशिकचा

| Updated on: Sep 21, 2021 | 3:48 PM

नाशिकच्या (Nashik) तरुणाने केरळमधल्या बँकेवर (Kerala Bank) पैलवानांच्या मदतीने दरोडा (robbery) टाकून तब्बल साडेसात किलो सोने लुटले आहे. रोखीमध्ये ही लूट साडेतीन कोटींची असून, पोलिसांनी याप्रकरणी सूत्रधार निक ऊर्फ निखिल जोशीला बेड्या ठोकल्या आहेत.

पैलवानांच्या मदतीने साडेसात किलो सोन्याची लूट...तब्बल साडेतीन कोटींचा ऐवज...चोरों का राजा नाशिकचा
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः नाशिकच्या (Nashik) तरुणाने केरळमधल्या बँकेवर (Kerala Bank) पैलवानांच्या मदतीने दरोडा (robbery) टाकून तब्बल साडेसात किलो सोने लुटले आहे. रोखीमध्ये ही लूट साडेतीन कोटींची असून, पोलिसांनी याप्रकरणी सूत्रधार निक ऊर्फ निखिल जोशीला बेड्या ठोकल्या आहेत. (7.5 kg of gold looted with the help of wrestlers, Rs 3.5 crore looted, robbery of Nashik youth in Kerala)

याबाबत सविस्तर वृत्त असे की, केरळमधल्या एका बँकेची तिजोरी फोडून चोरट्यांनी साडेसात किलो सोने लंपास केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. केरळ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तेव्हा याचे धागेदोरे महाराष्ट्रातल्या सातारापर्यंत येऊन पोहचले. या प्रकरणाचा तपास करताना केरळ पोलिसांनी तंत्रविश्लेषण शाखेची मदत घेतली. तेव्हा नाशिकच्या निक ऊर्फ निखिल जोशीचाही दरोड्यात समावेश असल्याचे समजले. ही माहिती केरळ पोलिसांच्या पथकाने सातारा येथे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन दिली. संशयित सातारा परिसरात असल्याचे सांगितले. पोलीस अधीक्षकांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना दिला. त्यांना केरळ पोलिसांना मदत करण्याची सूचना केली. पोलिसांना आरोपी साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये असल्याचे समजले. त्यांनी या हॉटेलवर छापा टाकला. तेव्हा या प्रकरणाचा सूत्रधार निखिल जोशी आणि त्याचे पैलवान साथीदार सचिन शेलार, नवनाथ पाटील, अतुल धनवे यांना बेड्या ठोकल्या.

इतर गुन्ह्यांचाही शोध सुरू 

गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार निखिल जोशी आणि त्याचे पैलवान साथीदार सचिन शेलार, नवनाथ पाटील, अतुल धनवे यांनी इतर ठिकाणी काही चोऱ्या केल्या आहेत का, याचा तपासही पोलिसांनी सुरू केला आहे. विशेष म्हणजे केरळ पोलिस या चौकडींनी केरळमध्ये अजून काही गुन्हे केले आहेत का, याचा शोध घेत आहे.

कारची काच फोडून अडीच लाखांची लूट

शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी उभ्या केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी अडीच लाख रुपये असलेली बॅग लुटली. नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयराम नेवदराम दियालानी (रा. टागोनगर) यांनी दुपारी आपली कार (एम. एच.15 ईआर 3133) शालिमार भागातील सांगली बँक सिग्नल परिसरातील जगन्नाथ रेस्टॉरंटसमोर उभी केली होती. तेव्हा चोरट्याने या कारची काच फोडली. चालकाच्या सीटवर असलेली बॅग लंपास केली. या बॅगेमध्ये अडीच लाखांची रक्कम आणि महत्त्वाची कागपदत्रे होती (7.5 kg of gold looted with the help of wrestlers, Rs 3.5 crore looted, robbery of Nashik youth in Kerala)

इतर बातम्याः

नाशिकच्या खमक्या पाटलांची बदली अखेर रद्द; जिल्हा पोलीस अधीक्षकपदीच राहणार, ‘त्या’ आमदाराच्या पत्राची मात्र जोरदार चर्चा

नाशिकः सांडपाण्यात वाहून गेला अन् नाल्याच्या जाळीत अडकला…गंगाघाटावर पोहणे पडले महागात