AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

96 लाख रुपयांची माया अज्ञात स्रोतातून जमवली, नाशिकच्या महिला शिक्षण अधिकाऱ्याला मोठा दणका

नाशिकमधील लाचखोर शिक्षण अधिकारी सुनीता धनगर यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. एसीबीने या प्रकरणी मोठं पाऊल उचललं आहे. त्यामुळे सुनीता धनगर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

96 लाख रुपयांची माया अज्ञात स्रोतातून जमवली, नाशिकच्या महिला शिक्षण अधिकाऱ्याला मोठा दणका
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: Chetan Patil | Updated on: Sep 02, 2023 | 8:37 PM
Share

नाशिक | 2 सप्टेंबर 2023 : नाशिक महापालिकेच्या लाचखोर शिक्षण अधिकारी सुनीता धनगर यांना झटका देणारी बातमी समोर आली आहे. सुनीता धनगर या 50 हजारांच्या लाच घेताना रंगेहात पकडल्या गेल्या होत्या. त्यांनी एका निलंबित मुख्यध्यापकाला कामावर रुजू करण्याचं पत्र पाठवण्यासाठी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केलेली. पण एसीबीने त्यांना लाच घेताना रंगेहात पकडलं होतं. याप्रकरणी एसीबीचा गेल्या काही महिन्यांपासून तपास सुरु होता. या तपासात धक्कादायक माहिती समोर आली होती. सुनीता धनगर यांच्या घराची झडती घेतली तेव्हा लाखो रुपयांची रोख रक्कम एसीबीच्या हाती लागली होती. याप्रकरणी आता एसीबी आक्रमक झालीय.

एसीबीने लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना आणखी एक दणका दिला आहे. एसीने सुनीता धनगर यांच्याविरोधात बेनामी संपत्ती जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एसीबीकडून नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीला या प्रकरणात कायदेशीर ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिकची मालमत्ता आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाखोंची माया अज्ञात स्रोतातून जमवली

सुनीता धनगर यांनी 96 लाख 43 हजार रुपये इतकी माया अज्ञात स्रोतातून जमवली, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. त्यामुळे सुनीता धनगर यांची ईडीकडून चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे विधानसभेतही सुनीता धनगर यांच्या लाचेचं प्रकरण गाजलं होतं. अनेकांनी सुनीता धनगर यांच्या चौकशीची मागणी केली होती. यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ईडीकडून चौकशी केली जाईल, असं आश्वस्त केलं होतं.

नाशिकमध्ये सातत्याने लाचेच्या घटना उघड

नाशिकमध्ये सातत्याने लाचेच्या घटना समोर येत आहेत. सुनीता धनगर प्रकरणानंतर आणखी काही प्रकरणं समोर आली होती. काही दिवसांपूर्वीच तहसीलदाराने लाच मागितल्याचा प्रकार समोर आला होता. एकामागे एक अशी प्रकरणं समोर येत आहेत, संबंधितांवर कारवाई देखील होत आहे, असं असताना लाचखोर अधिकाऱ्यांच्या कृत्यांना लगाम लागताना दिसत नाही. त्यामुळे यावर आगामी काळात काही ठोस पावलं उचलली जातात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा