Nashik Crime : मागील भांडणाचा कुरापत काढून दोघांवर प्राणघातक हल्ला; एकाचा मृत्यू, तर एक जखमी

| Updated on: Aug 11, 2023 | 6:11 PM

नाशिकमध्ये हल्ल्याच्या घटना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. लहान मुलांचे भांडण सोडवणे दोघा तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. दुपारी झालेल्या वादाच्या कारणातून रात्री भयंकर घटना घडली.

Nashik Crime : मागील भांडणाचा कुरापत काढून दोघांवर प्राणघातक हल्ला; एकाचा मृत्यू, तर एक जखमी
नाशिकमध्ये जुन्या वादातून दोघांवर हल्ला
Image Credit source: TV9
Follow us on

चैतन्य गायकवाड, टीव्ही 9 मराठी, नाशिक / 11 ऑगस्ट 2023 : नाशिकमध्ये गँगवार थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. दररोज काही ना काही कारणातून टोळक्यांकडून हल्ल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. भररस्त्यात घडणाऱ्या अशा गुन्हेगारी घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. अशीच एक घटना पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. सातपूर अंबड लिंक रोडवरील संजीवनगर परिसरात ही घटना घडली. जुन्या वादाच्या रागातून काल रात्री दोघांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. मेराज असगर अली खान असे मयत तरुणाचे नाव आहे. तर इब्राहिम हसन शेख असे जखमी तरुणाचे नाव आहे. दुपारी लहान मुलांचे भांडण सोडवायला तरुण गेले होते. यावेळी झालेल्या वादातून हा हल्ला करण्यात आला.

काय घडलं नेमकं?

संजीव नगर परिसरात राहणारा मयत मेराज असगर अली खान याच्या घरी काल रात्रीच्या सुमारास पाच ते सहा जणांचे टोळके तेथे आले. या टोळक्याने जुन्या भांडणाची कुरापत काढून मेराजवर धारदार शस्त्राने हल्ला केला. मेराजवर हल्ला होताना पाहून इब्राहिम शेख हा तरुण त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडला. हल्लेखोरांनी त्याच्यावरही हल्ला केला. यात इब्राहिम गंभीर जखमी झाला. हल्ल्याची थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

या हल्ल्यात मेराजचा जागीच मृत्यू झाला. जखमी इब्राहिमला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे अंबड परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

लहान मुलांचे भांडण सोडवायला जाणे महागात पडले

प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीवनगर येथे काही जण लहान मुलांना मारहाण करत होते. हा वाद सोडवण्यासाठी मेराज असगर अली खान आणि इब्राहिम हसन शेख हे गेले. याचा राग आल्याने काही तरुणांनी दोघांना बेदम मारहाण केली. त्यानंतर रिक्षातून काही तरुण आले. त्यांनी घरात घुसून दोन्ही तरुणांना बाहेर काढत त्यांच्यावर शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात मेराज असगर अली खान याचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या इब्राहिम हसन शेख याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.