AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिका निकालांनंतर सत्तासंघर्षाचा सुपर फ्रायडे, राज्याच्या 8 महापालिकांत आज महापौरांची निवड, कुठे कोणाचे पारडं जड?

नागपूर, नाशिक, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील ८ महानगरपालिकांमध्ये आज नव्या महापौरांचा फैसला होणार आहे. कुठे चुरशीची लढत आहे आणि कुठे निवड बिनविरोध झाली आहे, याची सविस्तर माहिती येथे वाचा.

महापालिका निकालांनंतर सत्तासंघर्षाचा सुपर फ्रायडे, राज्याच्या 8 महापालिकांत आज महापौरांची निवड, कुठे कोणाचे पारडं जड?
Mayor and Deputy Mayor Election
| Updated on: Feb 06, 2026 | 8:45 AM
Share

राज्यातील महापालिका निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सर्वत्र महापौर आणि उपमहापौर पदासाठीची चुरस रंगणार आहे. राज्यातील महापालिका निवडणुकीनंतर आजचा राजकीय पटलावरचा अत्यंत महत्त्वाचा दिवस उजाडला आहे. जळगाव, धुळे, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, सोलापूर आणि नाशिक या ८ महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवड प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ११ वाजल्यापासून विशेष सर्वसाधारण सभांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनेक शहरांत कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

शहरनिहाय राजकीय समीकरणे आणि चुरशीच्या लढती

नागपूर महापालिका 

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात महापौरपसाठी ‘ठाकरे’ विरुद्ध ‘ठाकरे’ असा सामना रंगताना दिसत आहे. त्यामुळे ही लढाई प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपने कुणबी कार्ड खेळत निता ठाकरे यांना रिंगणात उतरवले आहे, तर काँग्रेसने स्नेहल ठाकरे यांच्या माध्यमातून तगडे आव्हान दिले आहे. भाजपचे संख्याबळ ८४ असले तरी काँग्रेस ४१ जागा आहेत. त्यामुळे काही अनपेक्षित खेळी होते का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर बिनविरोध, उपमहापौरपदासाठी अंतर्गत पेच

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले असून महापौरपदासाठी रवी लांडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. मात्र, उपमहापौरपदासाठी महायुतीतच बिघाडी पाहायला मिळत आहे. भाजपच्या शर्मिला बाबर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या वैशाली काळभोर यांनी अर्ज दाखल केल्याने येथे मतदान रंगणार आहे.

नाशिक आणि सोलापुरात सत्तेसाठी रस्सीखेच

नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपच्या हिमगौरी आडके यांच्यासमोर शिवसेना (ठाकरे गट) च्या सीमा पवार यांनी आव्हान उभे केले आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अपक्षांची भूमिका कळीची ठरेल. तर सोलापुरात मित्रपक्षांमध्येच सामना पाहायला मिळत आहे. महापौरपदासाठी भाजपचे विनायक कोंडीयाल आणि शिवसेना (शिंदे गट) चे प्रियदर्शन साठे आमनेसामने आहेत.

अमरावतीत रंगतदार तिरंगी चुरस

अमरावतीत महापौरपदासाठी भाजपचे श्रीचंद तेजवाणी आणि काँग्रेसचे संजय शिरभाते यांच्यात थेट लढत आहे. उपमहापौरपदासाठी मात्र युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे, काँग्रेसच्या लुबना तनवीर आणि बसपाचे सचिन वैद्य यांच्यात त्रिकोणी संघर्ष पाहायला मिळत आहे.

जळगाव, धुळे आणि कोल्हापुरात औपचारिकता बाकी

जळगाव: महायुतीच्या सूत्रानुसार दिपमाला काळे (भाजप-महापौर) आणि मनोज चौधरी (शिवसेना-उपमहापौर) यांची निवड निश्चित मानली जात आहे.

धुळे: भाजपने पूर्ण वर्चस्व राखले असून मायदेवी परदेशी (महापौर) आणि ज्योत्सना पाटील (उपमहापौर) यांची निवड केवळ औपचारिकता आहे.

कोल्हापुरात येथे रुपाराणी निकम (महापौर) आणि दुर्वास कदम (उपमहापौर) आज पदभार स्वीकारतील.

महानगरपालिका महापौर उमेदवार (प्रमुख लढत) उपमहापौर उमेदवार
नागपूर निता ठाकरे (भाजप) vs स्नेहल ठाकरे (काँग्रेस) लिला हातीबेड (भाजप) vs विवेक निकोसे (काँग्रेस)
पिंपरी-चिंचवड रवी लांडगे (भाजप) शर्मिला बाबर (भाजप) vs वैशाली काळभोर (राष्ट्रवादी-अजित पवार)
नाशिक हिमगौरी आडके (भाजप) vs सीमा पवार (शिवसेना-ठाकरे गट)
अमरावती श्रीचंद तेजवाणी (भाजप) vs संजय शिरभाते (काँग्रेस) सचिन भेंडे (युवा स्वाभिमान), लुबना तनवीर (काँग्रेस), सचिन वैद्य (बसपा)
सोलापूर विनायक कोंडीयाल (भाजप) vs प्रियदर्शन साठे (शिवसेना-शिंदे गट) ज्ञानेश्वरी देवकर (भाजप)
जळगाव दिपमाला काळे (भाजप) मनोज चौधरी (शिवसेना-शिंदे गट)
धुळे मायदेवी परदेशी (भाजप) ज्योत्सना पाटील (भाजप)
कोल्हापूर रुपाराणी निकम दुर्वास कदम

पाहा व्हिडीओ :

Follow Us
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश