Jalgaon Murder : मोबाईलचा वाद, जळगावात तरुणाला चॉपरने भोसकलं! शिवकॉलनीत रक्तरंजित हत्याकांडाने खळबळ

Jalgaon Crime News : अक्षयच्या सोबत असलेला त्याचा मित्र युवराज मोतीलाल जाधव हा भांडणात पडला. तेव्हा त्याच्यावरही आरोपींनी वार करत त्यालाही जखमी केले. मद्यप्राशन करत असलेल्या भारत बंडू राठोड या तरुणाने जखमी अवस्थेत पडलेल्या अक्षयला जिल्हा रुग्णालयात हलवले.

Jalgaon Murder : मोबाईलचा वाद, जळगावात तरुणाला चॉपरने भोसकलं! शिवकॉलनीत रक्तरंजित हत्याकांडाने खळबळ
धक्कादायक घटना..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 2:37 PM

जळगाव : जळगाव (Jalgaon Murder) जिल्ह्यातील एका दारू अड्ड्याजवळ चॉपरने भोसकून तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. जळगाव शहरातील शिवकॉलनी (Shiv Colony Murder) परिसरात ही घटना घडली. हे हत्याकांड उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ माजलीय. मोबाईलच्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अक्षय (Akshay) नावाचा तरुण हा त्याच्या मित्रांसह घराजवळ गप्पा मारत होता. यादरम्यान दुचाकीवरून तीन ते चार जण आले. त्याला कुठलंतरी काम सांगून सोबत घेऊन गेले. यानंतर शिवकॉलनीतील देशी दारूच्या दुकानावर अक्षयचा बाळू पवार नामक तरुणासोबत वाद झाला. या वादातून अक्षयने बाळूच्या भावाला दगड मारुन फेकला. याचा राग आल्याने बाळूने अक्षयच्या पोटात चॉपरने सपासप वार करुन त्याचा खून केला.

यावेळी अक्षयच्या सोबत असलेला त्याचा मित्र युवराज मोतीलाल जाधव हा भांडणात पडला. तेव्हा त्याच्यावरही आरोपींनी वार करत त्यालाही जखमी केले. मद्यप्राशन करत असलेल्या भारत बंडू राठोड या तरुणाने जखमी अवस्थेत पडलेल्या अक्षयला जिल्हा रुग्णालयात हलवले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्याला मृत घोषित करण्यात आले. सध्या हत्याकांड प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

तपास सुरु

जळगाव शहर जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अक्षय नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयाात दाखल करण्यात आलं. हत्येची माहिती मिळाल्यानंतर फॉरेन्सिकटीमही घटनास्थळी दाखल झाली. आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत संशयास्पद गोष्टी ताब्यातही घेतल्या आहेत. आजूबाजूच्या लोकांशीही चौकशी करत पुढील तपात आता पोलिसांकडून केला जातोय.

हे सुद्धा वाचा

स्थानिक पोलीसांनी या हल्ल्यादरम्यान जखमी झालेल्या युवराज जाधव या तरुणाची प्राथमिक विचारपूस केली. त्यादरम्यान, हा हल्ला कुणी केला, का केला, याबाबतची धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून पुढील तपसा केला जातो आहे. अद्याप या हत्येप्रकरणी कुणाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आलेली नाही. बाळू पवार यावर हत्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी असून त्याचाही कसून शोध घेता जातोय

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.