ट्रक चालकावर तीक्ष्ण हत्याराने वार, मुंबई-नाशिक हायवेवर हॉटेलबाहेर हत्येचा थरार

| Updated on: Sep 24, 2021 | 11:24 AM

राजेंद्र भगवान कदम (रा. बानगाव, ता. नांदगाव, जि. नाशिक) असं हत्या झालेल्या 33 वर्षीय ट्रक चालकाचे नाव आहे. मुंबई - नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील खर्डी येथील हॉटेल सहारावर हत्येची घटना घडली आहे

ट्रक चालकावर तीक्ष्ण हत्याराने वार, मुंबई-नाशिक हायवेवर हॉटेलबाहेर हत्येचा थरार
ट्रक चालकाची हत्या
Follow us on

ठाणे : हॉटेलबाहेर थांबलेल्या ट्रकच्या चालकाची निर्घृण हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील खर्डी येथील हॉटेल सहाराजवळ मध्यरात्री 2 ते 2:30 वाजताच्या दरम्यान ही हत्या झाली.

राजेंद्र भगवान कदम (रा. बानगाव, ता. नांदगाव, जि. नाशिक) असं हत्या झालेल्या 33 वर्षीय ट्रक चालकाचे नाव आहे. मुंबई – नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील खर्डी येथील हॉटेल सहारावर हत्येची घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं?

हॉटेलमध्ये रात्री जेवण करण्यासाठी ट्रक ड्रायव्हर राजेंद्र कदम थांबला होता. जेवण झाल्यानंतर रात्री 2 वाजताच्या सुमारास MH-04 FD 4681 या आपल्या ट्रकने जात असताना अज्ञात व्यक्तीने तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार केले.

हत्येचं कारण अस्पष्ट

दरम्यान, ट्रक चालकाच्या हत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत शहापूर पोलिस अधिक तपास करत आहेत. ट्रक ड्रायव्हर हत्या कोणी आणि कशासाठी केली.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक चालकांची लूट

दुसरीकडे, मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक चालकांना चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. पुण्यातील मावळ भागात स्थानिक गुन्हे शाखेकडून टोळीतील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई पुणे दृतगती महामार्गावर वाहन चालकांना लुटल्याच्या घटना अनेक वेळा समोर येत असतात.

सापळा रचून दोघे ताब्यात

खालापूर येथील एक टोळी चोरीचे गुन्हे करत असल्याची खात्रीशीर माहिती गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर खालापूर तालुक्यातील मोरबेवाडी चौक येथे सापळा लावत क्राईम ब्रांचच्या पथकाने गणेश हरिभाऊ वाघमारे आणि संतोष उर्फ मंगल्या वाघमारे या दोघांना ताब्यात घेतले.

एक्सप्रेस वेवर ट्रक चालकांची लूट

आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, चोरी, गंभीर दुखापतीसह मारामारी असे गुन्हे दाखल आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक चालकांना थांबवून चाकूचा धाक दाखवत ते जबरी चोरी करत असल्याचा आरोप आहे.

संबंधित बातम्या :

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर चाकूच्या धाकाने ट्रक चालकांची लूट, दोन सराईत गुन्हेगार ताब्यात

पालघरमध्ये मद्यपी पर्यटकांचा पोलिसांवर हल्ला, बीचवर पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न