मोहम्मद हुसेन खान, टीव्ही 9 मराठी, पालघर : चिंचणी बीचवर मद्यपी पर्यटकांनी पोलिसांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पालघर जिल्ह्यात पर्यटनाला बंदी असतानाही समुद्र किनारी धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्यास पोलीस गेले होते. यावेळी आरोपींनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला.