CCTV VIdeo : नाशिकमध्ये हनुमान चालिसावरुन तरुणाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

नाशिकच्या पाथर्डी भागात एका खाजगी लॅबमध्ये घुसून येथे काम करणाऱ्या एका तरुणाला काही लोकांनी मारहाण केली आहे. हा संपूर्ण प्रकार लॅबमधील cctv मध्ये कैद झाला आहे. हनुमान चालीसा लावण्यावरून आपल्याला ही मारहाण झाल्याचा आरोप किशोर वाघमारेने केला आहे.

CCTV VIdeo : नाशिकमध्ये हनुमान चालिसावरुन तरुणाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
नाशिकमध्ये हनुमान चालिसावरुन तरुणाला मारहाण
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 29, 2022 | 4:14 PM

नाशिक : नाशिकच्या पाथर्डी फाटा येथे लॅबमध्ये काम करणाऱ्या तरुणाला 5 ते 6 जणांनी मिळून मारहाण (Beating) केल्याची घटना घडली आहे. हनुमान चालीसा (Hanuman Chalisa)च्या कारणावरून मारहाण झाल्याचा आरोप तरुणाने केला आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. किशोर वाघमारे असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. जागेच्या वादातून ही मारहाण झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. नक्की कोणत्या कारणातून मारहाण झाली याबाबत इंदिरानगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

लाईफ केअर पॅथॉलॉजी येथे घडली घटना

नाशिकच्या पाथर्डी भागात एका खाजगी लॅबमध्ये घुसून येथे काम करणाऱ्या एका तरुणाला काही लोकांनी मारहाण केली आहे. हा संपूर्ण प्रकार लॅबमधील cctv मध्ये कैद झाला आहे. हनुमान चालीसा लावण्यावरून आपल्याला ही मारहाण झाल्याचा आरोप किशोर वाघमारेने केला आहे. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पाथर्डी फाटा येथील राजश्री कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या लाईफ केअर पॅथॉलॉजी लॅब येथे किशोर रोज सकाळी लॅबला आल्यावर हनुमान चालीसा लावतो. नेहमीप्रमाणे त्याने हनुमान चालीसा लावलेली असताना 5 ते 6 जणांनी येथे येऊन हनुमान चालीसावरून वाद घातला. तसेच त्याला मारहाण केल्याचे किशोर वाघमारे याने सांगितले. तर या घटनेमध्ये जागेचा वाद असून त्यातून ही मारहाण झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. आता या संपूर्ण प्रकरणी इंदिरानगर पोलीस अधिक तपास करत आहे. (Young man beaten up on Hanuman Chalisa in Nashik, incident captured on CCTV)