Solapur : रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात दुचाकी ट्रकला धडकली, तरूणाचा जागीच मृत्यू

रस्ते खराब असल्याने आत्तापर्यंत असल्याने अनेक बाईक चालकांना अपघात झाला आहे. त्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांना जीवदान मिळाले आहे.

Solapur : रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात दुचाकी ट्रकला धडकली, तरूणाचा जागीच मृत्यू
रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात दुचाकी ट्रकला धडकली, तरूणाचा जागीच मृत्यू
Image Credit source: tv9 marathi
सागर सुरवसे

| Edited By: महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 29, 2022 | 12:20 PM

करमाळाअहमदनगर राज्य महामार्गावर मांगी (Mangi) येथील पुलावर ट्रक (Truck) व दुचाकीचा अपघात होऊन एक तरुण जागीच ठार झाला आहे. वसंत मारुती शिंदे (Vasant Shinde) (वय २८) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृत झालेला तरूण देवळाली येथील रहिवासी आहे. ही घटना आज सकाळी सात वाजचा घडली आहे. अपघाताची माहिती समजताच मांगी येथील शिवम बागल, पप्पू देशमाने, गणेश देशमाने हे मदतीला धावेल. तातडीने तरूणाला जवळच्या रूग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तरूणाला उपचारापुर्वी मृत घोषित केले.

नेमकं काय घडलं

करमाळा-नगर मार्गावर रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात मृत झालेला तरूण वसंत शिंदे हा भंगाराचा व्यवसाय करत होता. देवळालीतील वैदवाडी येथे तो राहत होता. करमाळ्याकडून जातेगावच्या दिशेने तो निघाला होता. तेव्हा त्यांचा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती समजताच देवळालीचे सरपंच आशिष गायकवाड यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी व गावातील इतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात हा अपघात झाला

अपघात झाल्यानंतर रुग्णवाहिका व पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली, असल्याचे घटनास्थळावरील उपस्थित नागरिक सांगत आहेत. एक रुग्णवाहिका आली मात्र मृतदेह घेऊन जात नाही असे सांगून रुग्णवाहिकेकडे निघून गेली. त्यानंतर खासगी रुग्णवाहिका बोलावण्यात आली आहे, असे सांगत नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. करमाळ्यापासून अवघ्या 5-6 किलोमीटरवर हा अपघात झाला आहे. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात हा अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला

रस्ते खराब असल्याने आत्तापर्यंत असल्याने अनेक बाईक चालकांना अपघात झाला आहे. त्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांना जीवदान मिळाले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तसेच पुढील तपासासाठी गरजेच्या गोष्टी घटनास्थळावरून घेतल्या आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें