AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लेक बाबांसारखी दिसते हे वाक्य तिला नेहमी खटकायचं, पण आईचा राग क्रौर्याची सीमा ओलांडेल असं कुणाला वाटलंही नाही, काय घडलं?

नाशिकमधील 3 महिन्याच्या मुलीच्या हत्येमागील धक्कादायक कारण समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. पोटच्या गोळ्याबद्दलच इतका द्वेष कसा निर्माण झाला यावरून संताप व्यक्त केला जात आहे.

लेक बाबांसारखी दिसते हे वाक्य तिला नेहमी खटकायचं, पण आईचा राग क्रौर्याची सीमा ओलांडेल असं कुणाला वाटलंही नाही, काय घडलं?
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Mar 22, 2023 | 12:16 PM
Share

नाशिक : नाशिकमध्ये घडलेल्या तीन महिन्याच्या चिमुकलीच्या हत्येच्या घटनेने धक्कादायक वळण घेतले आहे. जन्मदात्या आईनेच या मुलीची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. सासरच्याकडून होणाऱ्या जाचांला कंटाळून जन्मदात्या आईनेच या मुलीची गळा चिरून हत्या केल्याचं समोर आल्याने सर्वांच्या पायाखालची जमीन सरकलीय. नाशिकच्या धृवनगर परिसरामध्ये ध्रुवांशी रोकडे या तीन वर्षाच्या चिमुकलीची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या हत्येने शहरात एकच खळबळ उडाली होती तीन महिन्याच्या चिमुकलीचा शत्रू कोण असावा ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर महिला आयोगाने देखील मोठा संशय व्यक्त केला होता.

तीन महिन्यांच्या चिमूकलीची घटनेत पोलिसांनी केलेल्या तपासात खळबळ जनक माहिती समोर आली आहे. जन्मदात्या आईनेच सासरच्याकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून पोटच्या मुलीची गळा चिरून हत्या केली आहे.

अज्ञात महिलेने आपल्याला बेशुद्ध करून तिची गळा चिरून हत्या केली असा बनाव रचला होता. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने या प्रकरणाची चौकशी केली असता हत्या झालेल्या मुलीची आई संशयित युक्ता रोकडे हिनेच तिच्या मुलीची हत्या केल्याचं तपासात निष्पन्न झाल आहे.

सासरचे लोक मुलीला बापावर गेली बरे झाले असे म्हणून आईची छळवणूक करत असल्याने आईनेच मुली विषयी मनात द्वेष निर्माण करत पोटच्या मुलीची गळा चिरून हत्या केल्याचे उघड झाले आहे. घटनास्थळावरील परिस्थिती आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना आई बनाव करत असल्याचा संशय आला होता.

या अनुषंगाने पोलिसांनी आईचे व्हाट्सअप चाट आणि इतर माहितीच्या आधारावर या प्रकरणाचा तपास केला असता जन्मदात्या आईनेच आपल्या मुलीची हत्या केल्याचं समोर आले असून या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...