AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धावत्या बसमध्ये दोन महिला भिडल्या, कंडक्टर आणि प्रवासी महिलेत तुंबळ राडा, कारण काय?

नाशिकची सिटी लिंक बस सेवा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सिडको परिसरातून सिटी लिंक बस जात असतांना बसमध्ये दोन महिलांची तुंबळ हाणामारी चर्चेत आली आहे.

धावत्या बसमध्ये दोन महिला भिडल्या, कंडक्टर आणि प्रवासी महिलेत तुंबळ राडा, कारण काय?
Image Credit source: TV9 Network
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Apr 27, 2023 | 1:57 PM
Share

नाशिक : नाशिक शहराची लाईफलाइन असलेल्या सिटी लिंक बस सेवा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यामध्ये सिटीलिंकच्या बस कंडक्टर महिलेत आणि प्रवासी महिलेत हा तूफान राडा झाला आहे. सिडको परिसरात हा प्रकार घडला आहे. बुधवारी सिम्बॉयसिस कॉलेज येथून ही बस निमानी बस स्थानकात येत होती. त्यामध्ये एक महिला प्रवासी बसल्यानंतर तिच्याकडे सुट्टे पैसे देण्याची मागणी केल्यानंतर हा मारहाणीचा प्रकार घडला आहे. यामध्ये प्रवासी महिलेने बस कंडक्टर महिलेला मारहाण केली आहे. त्यामध्ये महिला जखमी असून त्यांच्यावर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. या संपूर्ण प्रकारामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी देखील झाली होती. याबाबत मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सिडको परिसरात नाशिक महानगर पालिकेच्या बस मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशी महिलेला तिकिटाचे सुट्टे पैसे द्या म्हटल्याने वाद होऊन प्रवाशी महिलेने महिला कंडक्टरला मारहाण केली.

या प्रकरणी महिला कंडक्टरच्या फिर्यादीवरून अनोळखी महिले विरुद्ध मारहाण संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिम्बॉयसिस ते निमानी एसटी सुनीता जाधव बसमध्ये कंडक्टर म्हणून ड्युटीवर होत्या.

बुधवारी ही बस सिम्बॉयसिस येथून निमानी येथे येत होती. सिम्बॉयसिस येथील बस स्टॉपवरून एक प्रवासी बसमध्ये बसली. बसही सिम्बॉयसिस येथून त्रिमूर्ती चौक येथे आल्यानंतर प्रवाशाला कंडक्टरने तिकीट काढण्याबाबत विचारणा केली.

त्यावेळी दोघांमध्ये वाद झाल्यानंतर प्रवाशाने महिला कंडक्टरशी हुज्जत घालून शिवीगाळ करून मारहाण केली त्यांनांतर जखमी त्यामुळे सुनीता जाधव यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे अ‍ॅडमिट करण्यात आले असून, त्यांच्यावर पुढील उपचार चालू आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?