नाशिकमध्ये रोखला 90 उंटाचा ताफा, राजस्थान कडून हैदराबादकडे जाणारा ताफ्यावर कसला संशय? नेमकं काय घडलं?

| Updated on: May 05, 2023 | 4:00 PM

खरंतर हा उंटांचा ताफा नंदुबार, धुळे मार्गी महाराष्ट्र हद्दीत आला होता. त्यानंतर नागरिकांना हे उंट कशासाठी जात आहे याबाबत शंका येत होती. हे उंट तस्करी साठी तर नेले जात नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात होती.

नाशिकमध्ये रोखला 90 उंटाचा ताफा, राजस्थान कडून हैदराबादकडे जाणारा ताफ्यावर कसला संशय? नेमकं काय घडलं?
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : राजस्थान येथून हैदराबादकडे जाणाऱ्या जवळपास 90 उंटांचा ताफा तस्करी जात असल्याचा संशय नाशिकयेथील नागरिकांना आला होता. उंटांचा भला मोठा ताफा रस्त्याने जात असल्याचे पाहून नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये गुरुवारी रात्रीच्या वेळी रस्त्यावरून उंट जात असल्याचे पाहून पशुप्रेमी तथा ॲनिमल वेल्फेअरच्या प्रतिनिधींना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ धाव घेतली होती. याबाबत पोलिसांना कळविण्यात आली होती. ही सर्व उंट पांजरपोळच्या जंगलात ठेवण्यात आली आहे. यामध्ये दोन उंटांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. खरंतर हे उंट बघण्यासाठी नाशिकच्या रस्त्यांवर मोठी गर्दी झाल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

खरंतर हा उंटांचा ताफा नंदुबार धुळे मार्गी महाराष्ट्र हद्दीत आला होता. त्यानंतर नागरिकांना हे उंट कशासाठी जात आहे याबाबत शंका येत होती. हे उंट तस्करी साठी तर नेले जात नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात होती.

दरम्यान, नाशिक पर्यन्त हा उंटांचा ताफा आला तरी त्यांना कुणी अडवले नाही हे विशेष. मात्र, नाशिकमध्ये हा उंटांचा ताफा अडविण्यात आला आहे. पशुप्रेमी तथा ॲनिमल वेल्फेअरचे प्रतिनिधी पुरुषोत्तम आव्हाड यांनी हा ताफा अडविला होता.

हे सुद्धा वाचा

उंट तस्करी साठी जात असल्याची माहिती पोलिसांना पशुप्रेमी तथा ॲनिमल वेल्फेअरच्या प्रतिनिधींनी दिली आहे. त्यावरून पोलिसांनी याची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. त्यामध्ये नाशिक शहराच्या जवळच असलेल्या पांजरपोळच्या जंगलात हे उंट जिल्हाधिकारी यांनी सोडण्याचे आदेश दिले आहे.

रात्री उशिरापर्यन्त ही सगळी प्रक्रिया केली जात होती. याच काळात उंट इतक्या मोठ्या प्रमाणात शहरात आलेच कसे, एका रांगेत चालत असल्याने नाशिककरांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामध्ये नागरिकांनी फोटो व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेयर केले आहे.

खरंतर या सर्व उंटासोबत चाळीस माणसं होती. त्याबाबत प्रत्येक जण वेगवेगळी उत्तरे देत असल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सुरुवातीला स्थानिक प्रशासनाने प्रतिसाद न दिल्याने खासदार मनेका गांधी यांच्याशी संपर्क केला होता. त्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया झाली असून अधिकचा तपास सुरू आहे.