कल्पना सुद्धा करू शकणार नाही असं 3 महिन्याच्या चिमुकलीसोबत घडलंय, आईला बेशुध्द केलं आणि… नाशिक हादरलं.

3 महिन्याच्या निष्पाप मुलीचा जीव घेतल्याने हळहळ व्यक्ती केली जात असून गंगापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण शहरात हलहळ व्यक्त केली जात आहे.

कल्पना सुद्धा करू शकणार नाही असं 3 महिन्याच्या चिमुकलीसोबत घडलंय, आईला बेशुध्द केलं आणि... नाशिक हादरलं.
Image Credit source: Google
| Updated on: Mar 21, 2023 | 9:03 AM

नाशिक : काही घटना या अशा असतात की त्याच्या मागील खरं कारण हे पोलिसांच्या तपासात समोर येत असतं. मात्र, प्राथमिक दृष्ट्या समोर आलेल्या बाबी ह्या देखील धक्कादायक असतात. त्यात जर निष्पाप चिमूकल्याचा जीव गेला असेल तर हळहळ व्यक्त केली जात आहे. नाशिकच्या ध्रुवनगर येथे अशीच एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. गंगापुर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये अवघ्या तीन महिन्यांच्या मुलीचा गळा चिरून हत्या झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. यामध्ये मुलीच्या आईला गुंगी देऊन बेशुद्ध करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

खरंतर याच भागाच्या काही अंतरावर रविवार गोळीबार करत एकावर कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यातील आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याच्या मागावर असतांना ध्रुवनगर येथे खुनाची घटना समोर आली आहे.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, 3 महिन्याच्या चिमूकलीचे वडील कामावर गेले होते. आज्जी या दूध आणण्यासाठी गेल्या होत्या. त्याच वेळेला घरात एक पंजाबी ड्रेसवर असलेली महिला घरात शिरली. आपल्या हातात असलेला रुमाल चिमूकलीच्या आईच्या नाकासह तोंडाला घट्ट लावून धरला.

रुमालाला गुंगीचे औषध लावल्याने आई बेशुद्ध पडली. त्यानंतर लागलीच धारधार शस्राने 3 महिन्याच्या चिमुकलीच्या गळ्यावर वार करत ठार करत पळ काढला. काही वेळातच दूध घेण्यासाठी आलेली आज्जी घरात आली आणि बघताच क्षणी आज्जीला धक्का बसला.

आज्जीने जोरात हंबरडा फोडला. दृश्य पाहून खरंतर आज्जीलाच मोठा धक्का बसला. तात्काळ याबाबत आज्जीने इतरांच्या मदतीने आपल्या मुलाला बोलविले. त्यामध्ये तात्काळ मुलगा हजर झाला तोपर्यन्त पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी तात्काळ महिलेला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच चिमूकलीचा मृत्यू झाला होता.

हे कृत्य कुणी केले याबाबत माहिती नसली तरी शुद्धीवर आलेल्या महिलेने घरात एक पंजाबी ड्रेसवर महिला आली आणि तिने माझ्या नाकाला रुमाल लावल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर काय घडलं याची कल्पना नसली तरी प्रत्यक्षात जे घडलं आहे ते धक्कादायक असून काळीज पिळवटून टाकनारे आहे.

भूषण रोकडे यांच्या तक्रारीवरुन गंगापुर रोड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास केला जात आहे. त्यामध्ये ध्रुवांशी या 3 महिन्याच्या मुलीचा गळा चिरल्याने हलहळ व्यक्त केली जात आहे.