AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिस अधिकाऱ्याला Dating App चा छंद, सायबर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन भिंग फुटलं, कुणी घातला गंडा ?

नाशिक शहरातील पोलिस दलात सध्या एका तक्रारीची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. ही तक्रार स्वतः एका पोलिस निरीक्षक पदावर असलेल्या व्यक्तीने ही तक्रार केली आहे.

पोलिस अधिकाऱ्याला Dating App चा छंद, सायबर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन भिंग फुटलं, कुणी घातला गंडा ?
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Mar 16, 2023 | 5:43 PM
Share

नाशिक : नाशिकच्या सायबर पोलिस ठाण्यात एका पोलिस निरीक्षकानेच सकाळी सकाळी धाव घेत तक्रार दिल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस अधिकाऱ्याला तब्बल दोन लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे ही रक्कम काढण्यामागील प्रकरण संपूर्ण पोलिस दलात चर्चेचा विषय ठरत आहे. डेटिंग अ‍ॅप अनइंस्टॉल केल्यानंतर पुन्हा इन्स्टॉल करतांना पासवर्ड विसरल्यानं हा सगळा प्रकार घडला आहे. गुगलवर जाऊन कस्टमर केअरचा नंबर घेऊन फोन करून मदत घेणं पोलिस निरीक्षकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. सायबर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिल्याने हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे.

नाशिक पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एका पोलिस निरीक्षकाने सायबर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. यामध्ये त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन त्यांची दोन लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.

तक्रारदार पोलिस निरीक्षक यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये डेटिंग अ‍ॅप इन्स्टॉल केले होते. त्याचा वापर करत होते. मात्र, एकदा त्यांनी अनइन्स्टॉल केले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा ते इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न केला. आणि तिथे त्यांना लॉगिन करतांना अडचण येऊ लागली.

आय डी आणि पासवर्ड विसरल्याने त्यांनी लॉगिन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये त्यांना वारंवार अपयश येत असल्याने त्यांनी शक्कल लढवली. कस्टमर केअरचा नंबर गुगलवरुन घेत संपर्क केला आणि मदत मागितली.

समोरील व्यक्तीने रिमोट घेणाऱ्या अ‍ॅपच्या माध्यमातून मोबाईलचा पूर्ण ताबा घेतला. आणि त्याच वेळी त्यांना पाच रुपयांचा ऑनलाईन व्यवहार करण्यास सांगितले. आणि त्यांनी त्यावेळेला ऑनलाइन असलेल्या भामट्याने संपूर्ण प्रोसेस बघून घेतली.

सर्व माहिती घेऊन ऑनलाइन भामटयांनी अवघ्या दोन तासात दोन लाखांची रक्कम काढून घेतली. त्यानंतर तक्रारदार पोलिस निरीक्षकाला पैसे कट झाल्याचा मेसेज मिळाला आणि त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या संपूर्ण प्रकरणानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि फिर्याद दिली. त्यानंतर मात्र संपूर्ण पोलिस दलात या डेटिंग अ‍ॅप प्रकरणाची जोरदार चर्चा होत आहे. विशेष बाब म्हणजे एका पोलिस अधिकाऱ्याची फसवणूक झाल्याने या फसवणुकीची जोरदार चर्चा होत आहे.

Follow Us
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती