AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सापडलेला मोबाईल परत द्यायला गेला होता, प्रमाणिकपणाचं कौतुक सोडाच जे घडलं ते भयंकर होतं, ऐकून धक्काच बसेल

खरंतर नितीन जाधव या तरुणाला शुक्रवारी मोबाईल सापडला होता. तो मोबाइल परत देण्यासाठी सिडको येथील त्रिमूर्ती‎ चौकातील रुग्णालयात गेला होता.

सापडलेला मोबाईल परत द्यायला गेला होता, प्रमाणिकपणाचं कौतुक सोडाच जे घडलं ते भयंकर होतं, ऐकून धक्काच बसेल
Image Credit source: TV9 Network
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Apr 24, 2023 | 4:49 PM
Share

नाशिक : नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. एका तरुणाचा निष्पाप बळी गेल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. खरंतर नितीन जाधव हा मुलगा रस्त्याने जात असतांना त्याला रस्त्यात मोबाईल सापडला होता. त्यानंतर त्या मोबाईलवर फोन आल्यानंतर त्याने रिसिव्ह केला. मोबाइलवर त्याने मला मोबाइल सापडल्याचे कळविले होते. त्यानंतर त्याच्याशी बोलून त्याला मोबाईल द्यायला गेल्यानंतर फोनवर बोलत असलेल्या दाम्पत्याने बेदम मारहाण केली. त्यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिकचा तपास सुरू आहे.

खरंतर नितीन जाधव या तरुणाला शुक्रवारी मोबाईल सापडला होता. त्यातून त्याने फोन केला असता एका व्यक्तिचा असल्याचे समोर आले. तो मोबाइल परत देण्यासाठी सिडको येथील त्रिमूर्ती‎ चौकातील रुग्णालयात गेला होता.

त्याच वेळी तिथे ज्या व्यक्तिने फोन केला होता तो नीलेश ठोके त्याचा मित्र प्रसाद मुळे आणि नीलेश याची पत्नी हिच्या सह काही पुरुषांनी नितीन जाधव याला बेदम मारहाण केली. याच वेळी महिलेस फोन का करतो म्हणून लोखंडी रॉडच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली आहे.

मारहाणीच्या घटनेत नितीन गंभीर जखमी झाला होता. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मेडिकल कॉलेज येथे स्थलांतरित करण्यात आले होते. त्यानंतर उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

प्रामाणिकपणे रस्त्यावर सापडलेला मोबाईल द्यायला गेल्यानंतर घडलेल्या या धक्कादायक प्रकरणाची अंबड पोलिस तपास करत असून तपासात कोणत्या बाबी समोर येतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान नितीन जाधव या मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाने दिलेल्या तक्रारीवरुण खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास केला जात आहे. त्यामध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश बिजली यांच्याकडून अधिकचा तपास केला जात आहे.

या घटणेनंतर प्रामाणिकपणा दाखवावा की नाही अशी चर्चा शहरात होऊ लागली असून या प्रकरणात पोलिस काय तपास करतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे पुढील अंबड पोलिसांची भूमिका महत्वाची असणार आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?