खंडणीचा नवा फंडा! महिलेसह दोघा संशयितांनी आठ लाख उकळले, गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिकमध्ये खळबळ, काय घडलं?

नाशिक शहरातील देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेला हा प्रकार ऐकून पोलिसही चक्रावले आहे. पोलिसांच्या तपासात कोणत्या बाबी समोर येतात हे पाहणे महत्वाचे आहे.

खंडणीचा नवा फंडा! महिलेसह दोघा संशयितांनी आठ लाख उकळले, गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिकमध्ये खळबळ, काय घडलं?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 12:47 PM

नाशिक : नाशिकमध्ये एका महिलेने दोन पुरुषांना घेऊन आठ लाखांची खंडणी वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे यासाठी लढवलेली शक्कल ऐकून पोलिस ही चक्रावून गेले आहे. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे महिलेसह तिच्या साथीदारांनी बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात बदनामीची भीती आणि चाकूचा धाक दाखवत आठ लाख उकळवले आहेत. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात याबाबत खंडणी आणि धमकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये नीलेश रमेशचंद्र अग्रवाल यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये देवळाली पोलिसांनी एकाला अटक केली असून दोघे फरार आहे.

यामध्ये एक तीस वर्षीय महिला आणि देवळाली कॅम्प येथील रवी वाघ आणि जळगाव येथील गणेश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेवर वाईट कॉमेंट करता म्हणून रेपच्या गुन्ह्यात अडकवतो म्हणत बदनामीची धमकी देत आठ लाख रुपये उकळवले आहे.

यामध्ये चाकूचा धाक दाखवत शिवीगाळ करत मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत पैसे उकळवले आहे. त्यानंतर नीलेश अग्रवाल यांनी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून घेत एकाला अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संदेश पाडवी यांच्याकडे या प्रकरणाचा तपास असून अधिकचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंदन जाधव करीत आहे. यामध्ये संबंधित महिलेसह एक साथीदार फरार असयाने त्यांचा शोध घेतला जात आहे.

नाशिक शहरातील देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेला हा प्रकार ऐकून पोलिसही चक्रावले आहे. पोलिसांच्या तपासात कोणत्या बाबी समोर येतात हे पाहणे महत्वाचे असले तरी दुसरीकडे पोलिसांच्या तपासात कोणत्या बाबी समोर येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महिलेसह दोघांनी पैसे उकळविण्यासाठी लढवलेली शक्कल खळबळ उडवून देणारा असून शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. थेट खंडणी गोळा करण्यासाठी बलात्काराच्या खोट्या गुन्ह्याची धमकी दिली जात असल्याने पोलिसांचं टेंशन देखील वाढले आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.