AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक इंजेक्शन दिलं आणि अवघ्या दोन मिनिटांत दोघांचा मृत्यू; काय घडलं?; कुठे घडली घटना?

नवी मुंबईतील कोपरखैरणे येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेथील एका रुग्णालयात एकाच वेळी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र या मृत्यूसाठी रुग्णाालयातील डॉक्टरच कारणीभूत असल्याचा आरोप शोकाकुल नातेवाईकांनी केला.

एक इंजेक्शन दिलं आणि अवघ्या दोन मिनिटांत दोघांचा मृत्यू; काय घडलं?; कुठे घडली घटना?
| Updated on: Dec 07, 2023 | 10:43 AM
Share

रवी खरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी मुंबई | 7 डिसेंबर 2023 : नवी मुंबईतील कोपरखैरणे येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेथील एका रुग्णालयात एकाच वेळी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र या मृत्यूसाठी रुग्णाालयातील डॉक्टरच कारणीभूत असल्याचा आरोप शोकाकुल नातेवाईकांनी केला. कोपर खैरणे मधील आकाशदीप रुग्णालयात एका तरूणाचा आणि एका महिलेचा अचानक मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त आणि शोकाकुल नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाशदीप रुग्णालयात एकाच वेळी दोन जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये एक तरूण आणि एका महिलेचा समावेश आहे. दोघांनाही दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या रुग्णांपैकी महिलेच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तर त्या तरूणावर मूळव्याधाची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्यानंतर दोघांनाही एक इंजेक्शन देण्यात आले आणि काही वेळातच दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. थोड्या वेळापूर्वी आपले जे लोक नीट होते, ते अचानक गेल्याने नातेवाईकांच्या शोकाला पारावार उरला नाही.

डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्यानेच दोघांचाही मृत्यू झाल्यांच आरोप नातेवाईकांनी केला असून संबंधित रुग्णालयाच्या डॉक्टरांवर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. त्यासाठी त्याने तातडीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास सुरू आहे.

परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ल्याने हादरली नवी मुंबई

नवी मुंबई आणखी एका धक्कादायक घटनेने हादरली. तेथे परीक्षेसाठी आलेल्या एका विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला झाल्याचे वृत्त आहे. पीडित विद्यार्थिनी ही नेरुळ येथे परीक्षा देण्यासाठी आली होती. मात्र अचानक एका तरूणाने तिच्यावर बिअरच्या बाटलीने वार करत जीवघेणा हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीन धाव घेत आरोपीला बेड्या ठोकून अटक केली. मात्र या घटनेमुळे नवी मुंबईतील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल असून सर्वजण दहशतीखाली आहेत.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.