डोंगरीत बसून ड्रग्जचा धंदा, विरोधात जाणाऱ्यांवर हल्ला, मुंबईतील लेडी डॉन अखेर एनसीबीच्या जाळ्यात !

एनसीबीन मुंबईच्या डोंगरी भागातील खतरनाक लेडी डॉनला बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून एनसीबी या लेडी डॉनच्या शोधात होते (NCB arrested Mumbai lady don female drug supplier in Dongari).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:09 PM, 8 Apr 2021
डोंगरीत बसून ड्रग्जचा धंदा, विरोधात जाणाऱ्यांवर हल्ला, मुंबईतील लेडी डॉन अखेर एनसीबीच्या जाळ्यात !

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबीची ड्रग्ज विरोधात धडाकेबाज कारवाई सुरुच आहे. या कारवाईत एनसीबीने आतापर्यंत अनेक मोठमोठ्या ड्रग्ज माफियांना जेरबंद केलं आहे. एनसीबीची ही कारवाई अद्यापही जारी आहे. एनसीबीने यावेळी आता मुंबईच्या डोंगरी भागातील खतरनाक लेडी डॉनला बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून एनसीबी या लेडी डॉनच्या शोधात होते. अखेर तिला जेरबंद करण्यात एनसीबीला यश आलंय. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी 6 एप्रिलला डोंगरी भागात छापा टाकून तिला ताब्यात घेतलं. ही लेडी डॉन मुंबईतील बार आणि डिस्को थेममध्ये ड्रग्जचा पुरवठा करायची (NCB arrested Mumbai lady don female drug supplier in Dongari).

एनसीबीचा लेडी डॉनच्या घरावर छापा

या लेडी डॉनचं नाव इकरा अब्दुल गफ्फार कुरेशी असं असून ती 22 वर्षांची आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी बुधवारी तिच्या डोंगरी येथील घरावर छापा टाकला. यावेळी त्यांना 52 ग्रॅम मेफेडरोने ड्रग्ज मिळाले. हे ड्रग्ज त्यांनी जप्त केले. त्यानंतर त्यांनी तिला अटक केली (NCB arrested Mumbai lady don female drug supplier in Dongari).

इकराचा संबंध थेट डी गँगसोबत?

विशेष म्हणजे इकरा कुरेशी ही एनसीबीच्या एका केसमध्ये वॉन्टेड लिस्टमध्ये होती, अशी माहिती एनसीबीचे चीफ समीर वानखेडे यांनी दिली. “एनसीबीने काही महिन्यांआधी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित ड्रग्ज माफिया चिंकू पठाण याला अटक केली होती. त्याने चौकशीदरम्यान इकराचं नाव सांगितलं होतं. तेव्हापासून एनीसीबी इकराच्या शोधात होती”, असं समीर वानखेडे यांनी सांगितलं.

‘इकरा ड्रग्ज माफियांच्या दुनियेतील राणी’

समीर वानखेडे यांच्या माहितीनुसार इकरा ही ड्रग्ज माफियांच्या दुनियेतील राणी आहे. इकराने ड्रग्डच्या वितरणासाठी पाच ते सहा महिला ठेवल्या आहेत. याच महिलांच्यामार्फत ती मुंबईतील मोठमोठे बार आणि डिस्को थेकमध्ये ड्रग्जचा पुरवठा करते.

इकराचा नवरा आणि बॉयफ्रेंड दोघी जेलमध्ये

विशेष म्हणजे इकरा इतकी खतरनाक आहे की जी व्यक्ती तिच्याविरोधात जाते त्या व्यक्तीवर ती थेट हल्ला घडवून आणते. सध्या इकराचा नवरा आणि बॉयफ्रेंड दोघं जेलमध्ये आहेत. इकराला पाच वर्षांचा लहान मुलगादेखील आहे. इकरा ही फेसबुक आणि इन्स्टाग्रामद्वारे देखील ड्रग्जची डील करते. तिचा व्यवसाय मुंबईतील अनेक भागांमध्ये पसरला आहे, अशी माहिती वानखेडे यांनी दिली.

हेही वाचा : फांदी मोडली, कौमार्य चाचणीत नवविवाहिता नापास, वरबंधूंनी लग्न मोडलं!