दोन मुलांच्या आईसोबत सुहागरात करण्यासाठी आला, ती गोष्ट अन्… दुसऱ्या दिवशी मोठा कहर

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात शेजाऱ्याचा दोन मुलांच्या आईवर डोळा होता. पण जेव्हा त्याची मागणी पूर्ण झाली नाही तेव्हा त्याने जे पाऊल उचललं ते पाहून पोलिसांनाही धक्का बसला...

दोन मुलांच्या आईसोबत सुहागरात करण्यासाठी आला, ती गोष्ट अन्... दुसऱ्या दिवशी मोठा कहर
Crime Sex
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Jun 13, 2025 | 1:24 PM

सध्याच्या काळात विवाहबाह्य संबंध असणे ही आश्चर्याची बाब नाही. दररोज अशा प्रकारच्या बातम्या समोर येत असतात. पण लग्नानंतर जोडीदाराला फसवणे कधीकधी स्वतःलाच महागात पडते. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशच्या संतकबीरनगर येथून समोर आला आहे. येथे दोन मुलांच्या आईला शेजाऱ्यासोबत प्रेम झाले. मध्यरात्री शेजारी आपल्या विवाहित मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला. मैत्रिणीने त्याची मागणी पूर्ण केली नाही, म्हणून नाराज होऊन शेजाऱ्याने आत्महत्या केली.

दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा महिलेने आपल्या खोलीचा दरवाजा उघडला, तेव्हा शेजाऱ्याचा मृतदेह तिथे लटकलेला होता. मृतदेह पाहून महिले जोरजोरात ओरडू लागली. तिने तातडीने पोलिसांना माहिती दिली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दुसरीकडे, मृतकाच्या कुटुंबीयांनी महिलेवर खुनाचा आरोप लावून गुन्हा दाखल केला आहे.

वाचा: अहमदाबाद विमान अपघातात खासदार सुनील तटकरे यांचे नातेवाईक

हा प्रकार महुली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अगया उर्फ सिदाही गावातील आहे. येथे राहणाऱ्या 22 वर्षीय राजपाल चौधरी याचा मृतदेह त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका विवाहित महिलेच्या घरातून सापडला. राजपालचा मृतदेह खोलीत फासावर लटकलेला आढळला. राजपालच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की जमिनीच्या वादातून महिलेने त्यांच्या मुलाची हत्या केली आहे. तर, महिलेने सांगितले की तिचे राजपालसोबत प्रेमसंबंध होते. तिचा पती दुसऱ्या राज्यात काम करतो. मध्यरात्री राजपाल तिला भेटण्यासाठी तिच्या घरी आला. तो तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवू इच्छित होता. पण महिला आपल्या दोन मुलांना घेऊन छतावर झोपायला गेली. यामुळे नाराज होऊन राजपालने आत्महत्या केली.

‘जबरदस्ती करत होता’

महुली पोलिसांना महिलेने सांगितले की, मंगळवारी मध्यरात्री जेव्हा राजपाल चौधरी माझ्या घरात घुसला, तेव्हा तो माझ्यासोबत जबरदस्ती करू लागला. म्हणून मी माझ्या दोन मुलांना घेऊन छतावर झोपायला गेले. दरम्यान, राजपालने माझ्याच साडीचा फास बनवून खोलीत आत्महत्या केली. जेव्हा मी सकाळी खोलीत गेले, तेव्हा राजपालचा मृतदेह फासावर लटकलेला आढळला.

पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ

दुसरीकडे, मृतकाची आई सुशीला देवी आणि बहिणींचा आरोप आहे की राजपालची हत्या झाली आहे. आरोपी महिलेविरुद्ध कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करत आहेत. पोलीस ठाण्याबाहेर मृतकाच्या कुटुंबीयांनी बराच वेळ गोंधळ केला. नंतर पोलिसांच्या समजुतीनंतर गोंधळ शांत करण्यात आला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.