शेजाऱ्यांमध्ये जमिनीचा वाद सुरु होता, वाद मिटवण्यासाठी शेजाऱ्याने थेट शेजाऱ्यालाच…

अनेक दिवसांपासून दोघा शेजाऱ्यांमध्ये जमिनीचा वाद सुरु होता. हा वाद विकोपाला गेला अन् घडू नये ते घडून गेलं. यामुळे शहरात एकच खळबळ माजली.

शेजाऱ्यांमध्ये जमिनीचा वाद सुरु होता, वाद मिटवण्यासाठी शेजाऱ्याने थेट शेजाऱ्यालाच...
जमिनीच्या वादातून शेजाऱ्याने शेजाऱ्याला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 7:03 PM

पाटणा : जमिनीच्या वादातून शेजाऱ्याने शेजाऱ्याची सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना बिहारमधील पाटणा शहरात घडली. अर्जुन सिंग असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. पाटणा शहरातील आलमगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिस्कॉमन कॉलनीत 18 एप्रिल रोजी प्रॉपर्टी डीलर अर्जुन सिंगची हत्या झाली होती. या हत्येचा छडा लावण्यास अखेर पोलिसांना यश आले आहे. जमिनीच्या वादातून शेजारी विजय यादव याने अर्जुनसिंगची तीन लाखांची सुपारी देऊन शूटर्सच्या माध्यमातून हत्या केली.

सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीद्वारे प्रकरणाचा उलगडा

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी एक लोडेड पिस्तुल, पाच जिवंत काडतुसे, एक मोटारसायकल आणि पाच मोबाईल याशिवाय घटनेत वापरलेली पॅशन प्रो मोटारसायकल जप्त केली आहे. अर्जुन सिंगच्या हत्येनंतर पोलिसांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. पोलिसांनी तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीद्वारे प्रकरणाचा उलगडा केला.

शेजाऱ्यांमध्ये अनेक दिवसांपासून सुरु होता वाद

प्रॉपर्टी डीलर अर्जुन सिंग याचा शेजारी विजय यादव याच्यासोबत अनेक दिवसांपासून जमिनीवरुन वाद सुरू होता. या वादातून विजय यादवने अर्जुन सिंगला तीन लाखांची सुपारी देऊन त्याची हत्या केली. विजय यादवने यापूर्वीही अर्जुन सिंगवर गोळीबार केल्याचा आरोप केला होता. अर्जुन सिंगला नालंदा जिल्ह्यातील रहिवासी शूटर सूरज कुमार आणि आगमकुआनमधील रहिवासी शूटर आशिक उर्फ ​​छोटू यांनी गोळ्या घातल्या, तर तिसरा शूटर अभिनंदन कुमार संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून होता.

हे सुद्धा वाचा

मुख्य सूत्रधार फरार

धनरुआचा रहिवासी बिट्टू कुमार आणि मसौरीचा रहिवासी नितीश कुमार यांनी आरोपींना हत्या करण्यात मदत केली होती. या हत्येचा सूत्रधार विजय यादव यालाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार विजय यादव याला पकडण्यासाठी पोलीस सर्वत्र छापेमारी करत आहेत.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.