सचिन वाझेंची 200 पानी डायरी NIA च्या हाती, कोड लँग्वेजमधील हिशोब उघडकीस?

| Updated on: Mar 23, 2021 | 10:11 AM

सचिन वाझेंच्या डायरीतून हफ्त्याची गुपितं उघडकीस येण्याची शक्यता आहे. कुणाला किती पैसे जात होते, याचा हिशेब सचिन वाझे ठेवत होते. (NIA inquiry Sachin Vaze Diary)

सचिन वाझेंची 200 पानी डायरी NIA च्या हाती, कोड लँग्वेजमधील हिशोब उघडकीस?
सचिन वाझे
Follow us on

मुंबई : अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या डायरीतून अनेक आर्थिक व्यवहार उघडकीस येण्याची शक्यता आहे. एनआयए (NIA) च्या हाती वाझेंची 200 पानी डायरी लागली आहे. (NIA inquiry into Suspended Police Officer Sachin Vaze Diary)

सचिन वाझेंच्या ऑफिसची झाडाझडती घेताना एनआयएच्या हाती सचिन वाझेंची डायरी लागली होती. कोणत्या दिवशी कोणाला भेटायचंय, याचीही तारीख डायरीत नमूद करण्यात आली आहे. पब्ज, बार, बुकी आणि इतर महत्त्वाच्या कारवायांचा उल्लेख आहे.

हफ्त्याची गुपितं उघडकीस येणार

सचिन वाझेंच्या डायरीतून हफ्त्याची गुपितं उघडकीस येण्याची शक्यता आहे. कुणाला किती पैसे जात होते, याचा हिशेब सचिन वाझे ठेवत होते. डायरीत मुंबईतील सर्व बार, पब आणि हुक्का पार्लरची यादी आहे. ज्यांनी पैसे दिले त्याबाबत कोड भाषेत नोंद आहे.

कोड भाषेत नोंद

लाखाच्या नोंदीसाठी L, तर हजाराच्या नोंदीसाठी K हे अक्षर वापरले आहे. बार, पब, हुक्का पार्लर यांची येणारी रक्कम आणि दिलेली रक्कमही लिहिली आहे. पैशाचं वाटप नियमित होत होतं. त्याबाबतही कोड भाषेत नोंद आहे. व्यक्तीऐवजी विभाग लिहिण्यात आला आहे.

एनआयए आणि ईडीचा समांतर तपास

एनआयए आणि ईडी समांतर तपास करणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पाच आलिशान गाड्या, साडेपाच लाखांची रोकड, पैसे मोजण्याची मशीन आणि संशयित डायरी ईडीच्या रडारवर आहे. गुन्ह्यात आर्थिक गैरव्यवहाराचा तपास ईडी करण्याची शक्यता आहे.

सचिन वाझे यांच्या जप्त केलेल्या मोबाईलमधूनही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. पोलिस दलात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झाल आहे. हा भ्रष्टाचार उघडकीस येणार असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

ईडीचा ससेमिरा मागे लागण्याची चिन्हं

राष्ट्रीय तपास यंत्रणेनंतर (NIA) आता महाविकास आघाडी सरकारच्या मागे आणखी एका केंद्रीय यंत्रणेचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir singh) यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि काही पोलीस अधिकाऱ्यांना बार आणि रेस्टॉरंटसकडून 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा दावा परमबीर सिंह या पत्रात केला होता. ही रक्कम खूपच मोठी असल्याने आता सक्तवसुली संचलनालय (ईडी) स्वत:हून या प्रकरणाची चौकशी करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या अडचणीत आणखीनच भर पडू शकते.

संबंधित बातम्या:

Parambir Letter Bomb: IPS ज्युलियो रिबेरोंनी शरद पवारांचा प्रस्ताव नाकारला; लेटरबॉम्बचा तपास करण्यास नकार

‘लेटरबॉम्ब’प्रकरणाची ज्युलिओ रिबेरो सारख्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी व्हावी: शरद पवार

फडणवीस आणि परमबीर सिंह दिल्लीत येऊन गेल्यावर महाराष्ट्रात लेटर बॉम्ब: शरद पवार

(NIA inquiry into Suspended Police Officer Sachin Vaze Diary)