Parambir Letter Bomb: IPS ज्युलियो रिबेरोंनी शरद पवारांचा प्रस्ताव नाकारला; लेटरबॉम्बचा तपास करण्यास नकार

या वयात मी तपास करु शकणार नाही. माझ्यात तेवढी ताकद नाही. | Julio Ribeiro sharad pawar

Parambir Letter Bomb: IPS ज्युलियो रिबेरोंनी शरद पवारांचा प्रस्ताव नाकारला; लेटरबॉम्बचा तपास करण्यास नकार
मी असे अधिकारी आणि राजकारण्यांवर बिलकूल विश्वास ठेवत नाही, यांना खोटं बोलायची सवय असते.
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 9:22 AM

मुंबई: माजी IPS अधिकारी ज्युलियो रिबेरो (Julio Ribeiro) यांनी परमबीर सिंह यांच्या पत्राबाबत तपास करण्याचा प्रस्ताव नाकारला आहे. मला या घटनेचा तपास करायचा नाही. मला अद्याप याबाबत कोणतीही विचारणा झालेली नाही. शरद पवार (Sharad Pawar) यांनी माझ्या नेतृत्त्वाखाली तपास व्हावी, असे फक्त सुचविले होते. पण आता मी 92 वर्षांचा आहे. या वयात मी तपास करु शकणार नाही. माझ्यात तेवढी ताकद नाही. अंगात तेवढी उर्जा असती तरी मी याप्रकरणाची चौकशी केली नसती. कारण, या माध्यमातून अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण केले जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया ज्युलिओ रिबेरो यांनी व्यक्त केली. (Julio Ribeiro refuses sharad pawar proposal to probe parambir singh letter bomb case)

परमबीर सिंह यांना या सगळ्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी मंत्र्यांना या गोष्टीची माहिती दिली पाहिजे होती. अशाप्रकारे पत्र लिहणे हे त्यांचे काम नाही. आयुक्तपदावरुन बदली झाल्यानंतर परमबीर सिंह यांनी हे पत्र लिहल्याची बाब ज्युलिओ रिबेरो यांनी अधोरेखित केली.

तुम्हाला परमबीर सिंहांवर विश्वास आहे का?

ज्युलिओ रिबेरो यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणावर भाष्य केले. यावेळी त्यांना तुम्हाला परमबीर सिंह यांच्या दाव्यात तथ्य वाटते का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ज्युलिओ रिबेरो यांनी, ‘नाही, मी असे अधिकारी आणि राजकारण्यांवर बिलकूल विश्वास ठेवत नाही, यांना खोटं बोलायची सवय असते’, असे सांगितले.

शरद पवार काय म्हणाले होते?

हे गंभीर प्रकरण आहे. पोलिसांकडून या प्रकरणी आरोप झाले आहेत. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाची ज्युलिओ रिबेरो यांच्यासारख्या चांगल्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी झाली पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले होते.

कोण आहेत ज्युलिओ रिबेरो?

ज्युलिओ रिबेरो 1953 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी मुंबईचे 21 वे पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी 1982 ते 1986 या काळात काम पाहिलं होते. रिबेरो हे सीआरपीएफचे डिजीही होते शिवाय गुजरातचे पोलीस महासंचालक म्हणून त्यांनी काम पाहिलंय. 1989 साली ते पोलीस दलातून निवृत्त झाले. रिबेरो यांना पदमभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. ज्युलिओ रिबेरो यांची कारकिर्द अतिशय कडक स्वरुपाची होती. ज्युलिओ रिबेरो यांची नॅान करप्ट अशी प्रतिमा राहिलीय.

संबंधित बातम्या:

मुंबई पोलीस ते केंद्रीय गृहमंत्रालय ज्यांनी गाजवलं ते ज्युलिओ रिबेरो कोण आहेत?

‘लेटरबॉम्ब’प्रकरणाची ज्युलिओ रिबेरो सारख्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी व्हावी: शरद पवार

फडणवीस आणि परमबीर सिंह दिल्लीत येऊन गेल्यावर महाराष्ट्रात लेटर बॉम्ब: शरद पवार

(Julio Ribeiro refuses sharad pawar proposal to probe parambir singh letter bomb case)

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.