मुंबई पोलीस ते केंद्रीय गृहमंत्रालय ज्यांनी गाजवलं ते ज्युलिओ रिबेरो कोण आहेत?

शरद पवारांनी उदाहारण दिलेले ज्युलिओ रिबेरो नक्की कोण हे जाणून घेणं महत्वाच आहे. Julio Ribeiro Sharad Pawar

मुंबई पोलीस ते केंद्रीय गृहमंत्रालय ज्यांनी गाजवलं ते ज्युलिओ रिबेरो कोण आहेत?
ज्युलिओ रिबेरो

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर आहेत, असं म्हटलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी ज्युलिओ रिबेरो सारख्या एखाद्या उत्तम अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. शरद पवारांनी उदाहारण दिलेले ज्युलिओ रिबेरो नक्की कोण हे जाणून घेणं महत्वाच आहे. (Know about who is Julio Ribeiro NCP Chief Sharad Pawar Mentioned in Press Conference today )

कोण आहेत ज्युलिओ रिबेरो?

ज्युलिओ रिबेरो 1953 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी मुंबईचे 21 वे पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी 1982 ते 1986 या काळात काम पाहिलं होते. रिबेरो हे सीआरपीएफचे डिजीही होते शिवाय गुजरातचे पोलीस महासंचालक म्हणून त्यांनी काम पाहिलंय. 1989 साली ते पोलीस दलातून निवृत्त झाले. रिबेरो यांना पदमभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. ज्युलिओ रिबेरो यांची कारकिर्द अतिशय कडक स्वरुपाची होती. ज्युलिओ रिबेरो यांची नॅान करप्ट अशी प्रतिमा राहिलीय.

पंजाबचा असंतोष मोडून काढणारे पोलीस अधिकारी

ज्युलिओ रिबेरो हे 1982-86 दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त होते. आयुक्तपदानंतर केंद्रात CRPF चे महासंचालक होते. काही काळ गुजरातचे पोलीस महासंचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. पंजाबमधला असंतोष मोडून काढणारे पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयात काम

ज्युलिओ रिबेरो यांनी केंद्रीय गृहमंत्रालयात विशेष गृहसचिव म्हणून काम केले आहे. पंजाब सरकारचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केलं. 1989-93 पर्यंत रोमानियात भारताचे राजदूत म्हणून रिबेरो यांनी काम केले. 1987 साली रिबेरो यांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला.’बुलेट फॉर बुलेट’ हे रिबेरो यांचे आत्मचरित्र देखील प्रसिद्ध झाले असून त्यांचं सध्याचं वय 91 वर्ष आहे. रिबेरो यांचा जन्म 5 मे 1929 रोजी झाला होता.

ज्युलिओ रिबेरोंवर प्राणघातक हल्ले

ज्युलिओ रिबेरो यांच्यावर 1986 मध्ये 6 शिखांकडून पोलीस गणवेशात मुख्यालयातच हल्ला झाला होता. 6 शिख व्यक्तींनी केलेल्या हल्ल्यात गार्ड ठार झाले होते. तर रिबेरो यांच्यासह पत्नी व 4 सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते. सहाही हल्लेखोर हल्ल्यानंतर ट्रकमधून पसार झाले होते. खलिस्तान कमांडोने रिबेरोंवरील हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. 1991 मध्ये शीख हल्लेखोराकडून रोमानियाची राजधानी बुचारेस्टमध्ये रिबेरो यांच्यावर हल्ला झाला होता.

संबंधित बातम्या:

‘लेटरबॉम्ब’प्रकरणाची ज्युलिओ रिबेरो सारख्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी व्हावी: शरद पवार

फडणवीस आणि परमबीर सिंह दिल्लीत येऊन गेल्यावर महाराष्ट्रात लेटर बॉम्ब: शरद पवार

(Know about who is Julio Ribeiro NCP Chief Sharad Pawar Mentioned in Press Conference today)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI