अमृता फडणवीस यांना शिवीगाळ करणारी महिला ठाण्यातील; पोलिसांनी केली अटक

| Updated on: Sep 13, 2022 | 7:07 PM

7 सप्टेंबर रोजी फेसबुकवर अमृता फडणवीस यांच्या फेसबुक पोस्टच्या खाली अपशब्द लिहित कमेंट करण्यात आली होती. तसेच कमेंट्मध्ये शिव्या देखील पोस्ट करण्यात आल्या होत्या.

अमृता फडणवीस यांना शिवीगाळ करणारी महिला ठाण्यातील; पोलिसांनी केली अटक
Follow us on

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याबाबत फेसबुकवर (Facebook) आक्षेपार्ह भाषेत (offensive language)पोस्ट करण्यात आल्या होत्या. तसेच त्यांना फेसबुकवर शिवीगाळ देखील झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे.

ठाण्यातून या महिलेला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र सायबर (Maharashtra Cyber Police) पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली आहे. स्मृती पांचाळ असे अटक झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी महिलेचा मोबाईल (Mobile) जप्त केला आहे

7 सप्टेंबर रोजी फेसबुकवर अमृता फडणवीस यांच्या फेसबुक पोस्टच्या खाली अपशब्द लिहित कमेंट करण्यात आली होती. तसेच कमेंट्मध्ये शिव्या देखील पोस्ट करण्यात आल्या होत्या. एकापाठोपाठ एक अशा चार पोस्ट करण्यात आल्या होत्या. या पोस्ट्स आक्षेपार्ह आणि अर्वाच्या भाषेत लिहिण्यात आल्या होत्या.

यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर पोलिसांनी याचा तपास सुरु केला होता. अखेरीस पोलिसांनी या पोस्ट करणाऱ्या महिलेचा छडा लावला.

आपली ओळख लपवण्यासाठी आरोपी महिलेने ‘गणेश कपूर’ नावाचे फेक फेसबुक अकाऊंट तयार केले होते. या अकाउंटवरुनच महिलेने अमृता फडणवीस यांच्या पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट केल्या होत्या.

पोलिसांनी अखेर या महिलेला अटक केली आहे. आरोपी महिलेला आज कोर्टात हजर करण्यात आले आहे. कोर्टाने या महिलेला 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे.

अमृता फडणवीस  या सोशल मिडियावर चांगल्याच अॅक्टीव्ह आहेत. त्या त्यांचे फोटो आणि विविध कार्यक्रमांची माहिती सोशल मिडियावर शेअर करत असतात.