पानपट्टीची तोडफोड केल्याचा संशय, बेदम मारहाण करत एकाला संपवले

जीलानी यांनी आपल्या पानपट्टीची तोडफोड केल्याचा संशय गणेश होता. यातूनच त्याने जीलानी यांना लाथाबुक्क्यांनी पोटावर, छातीवर, गुप्तांगावर आणि तोंडावर बेदम मारहाण केली होती.

पानपट्टीची तोडफोड केल्याचा संशय, बेदम मारहाण करत एकाला संपवले
पानपट्टीची तोडफोड केल्याच्या संशयातून एकाची हत्या
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Sep 17, 2022 | 8:57 PM

सांगली : पानपट्टीची तोडफोड केल्याचा संशयातून बेदम मारहाण (Beating) करून एकाची निर्घृणपणे हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील मिरज शहरात स्टेशनरोडवर आली आहे. जीलानी कुडचिकर असे मयत इसमाचे नाव आहे. तर गणेश खन्ना नायडू असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसा (Mahatma Phule Chowk Police)त हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.

पानपट्टीची तोडफोड केल्याच्या संशयातून हत्या

जीलानी यांनी आपल्या पानपट्टीची तोडफोड केल्याचा संशय गणेश होता. यातूनच त्याने जीलानी यांना लाथाबुक्क्यांनी पोटावर, छातीवर, गुप्तांगावर आणि तोंडावर बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत जीलानी गंभीर जखमी झाले.

गंभीर जखमी जीलानीचा उपचारादरम्यान मृत्यू

गंभीर जखमी अवस्थेत जीलानी यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच जीलानी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. केवळ संशयातून झालेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार

महात्मा चौक पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी गणेश खन्ना नायडू याची चौकशी करताना तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे कळले.

महात्मा गांधी चौक पोलिसांनी गणेशला अटक करत त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस करीत आहेत. केवळ पानपट्टी तोडल्याच्या क्षुल्लक कारणातून हत्या झाली की काही जुना वाद होता ? हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल.