Crime News : दगड कापणाऱ्या मशीनने प्रेयसीच मुंडक उडवलं, काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Crime News : मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रियकराने जे केलं, ते खूपच धक्कादायक. फक्त एका गोष्टीसाठी 15 वर्षापासूनच अफेअर विसरला.

Crime News : दगड कापणाऱ्या मशीनने प्रेयसीच मुंडक उडवलं, काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Love affair murder
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 3:25 PM

हैदराबाद : प्रेमाच्या नात्यात आपुलकी, ओढ, जिव्हाळा असतो. नातं जितकं जुन तितक ते भक्कम मानल जातं. प्रेमाच नातं हे विश्वासाच्या पायावर उभं असतं. पण काही अपवादात्मक घटनांमध्ये प्रेमाची जागा हिंसा, सैतानी प्रवृत्ती घेते. अशीच एक काळाजाचा थरकाप उडवणारी घटना हैदराबादमध्ये घडली आहे. एका 48 वर्षाच्या प्रियकराने 55 वर्षीय प्रेयसीला क्रूर पद्धतीने संपवलं.

तीगलगुडा रोड येथे मुसी नदीजवळ कचरापेटीमध्ये स्वच्छता कामागाराला महिलेच कापलेलं मुंडक सापडलं, तेव्हा या धक्कादायक हत्याकांडाचा उलगडा झाला.

आरोपीकडून क्रौर्याचा कळस

या गुन्ह्यामध्ये आरोपीने क्रौर्याचा कळस गाठला. त्याने हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले व काही दिवस फ्रिजमध्ये ठेवले. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे. येर्रम अनुराधा रेड्डी (55) असं मृत महिलेच नाव आहे. ती हैदराबाद दिलशुकनगर येथे रहायला होती.

वादाच कारण काय?

48 वर्षीय चंद्र मोहनचे मागच्या 15 वर्षांपासून येर्रमसोबत प्रेमसंबंध होते. येर्रमचा नवरा तिला खूप आधीच सोडून गेला होता. ती तळमजल्यावर मोहनच्या घरात राहत होती. येर्रम अनुराधा रेड्डी गरजवंताना व्याजावर पैसे द्यायची. 2018 साली मोहनने येर्रम अनुराधा रेड्डीकडून 7 लाख रुपये घेतले. बऱ्याचदा विनंती करुनही मोहन ते पैसे परत करत नव्हता. इंडिया टुडेने हे वृत्त दिलय.

छातीवर वार केले

12 मे रोजी दुपारी चंद्र मोहन आणि येर्रममध्ये पैशांच्या विषयावरुन जोरदार वादावादी झाली. त्याने संतापाच्या भरात येर्रमवर चाकू हल्ला केला. तिच्या छातीवर वार केले. गंभीर जखमी झालेल्या येर्रमचा मृत्यू झाला. पाय आणि हात कापून फ्रिजमध्ये ठेवले.

त्यानंतर मोहन दगड कापणाऱ्या मशीन घेऊन आला. त्याने आधी धड शरीरापासून वेगळं केलं. त्यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे केले. पाय आणि हात कापून फ्रिजमध्ये ठेवले. त्यानंतर मुंडक कचरापेटीत टाकलं. दुर्गंधी पसरु नये, यासाठी त्याने परफ्युम आणला. त्याने रेड्डीच्या फोनवरुन मित्रांना मेसेज केले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.