
जेव्हा ती शेवटची घराबाहेर पडली होती, तेव्हा तीचं वय होतं अवघं 15 वर्षांचं, मात्र ती घरात परतली आणि त्यानंतर ती पुन्हा कधीच बाहेरचं जग बघू शकली नाही. तब्बल 27 वर्ष तिला तिच्या आई- वडिलांनी आपल्याच घरात कैद करून ठेवलं होतं. जेव्हा ती आता घराबाहेर पडली तेव्हा ती 42 वर्षांची झाली आहे. तीने तब्बल 27 वर्षांनंतर पहिल्यांदाच पुन्हा हे जग पाहीलं आहे. इतर मुलींप्रमाणेच तिला उचं भरारी घ्यायची होती, हे संपूर्ण जग आपल्या कवेत घ्यायचं होतं. मात्र तिचे सर्व स्वप्न आता स्वप्नचं राहिली आहेत, ही एखाद्या चित्रपटाची कथा नाहीये, तर हा धक्कादायक प्रकार एका मुलीच्या बाबतीत घडला आहे. ही मुलगी सध्या रुग्णालयात जीवन मरणाच्या दारात उभी आहे, तिच्यावर उपाचार सुरू आहेत.
ही घटना पोलंडमध्ये घडली आहे, मिरेला असं या मुलीचं नाव आहे, 1998 मध्ये मिरेला ही अचानक गायब झाली होती, त्यानंतर तब्बल 27 वर्षांनी 2025 मध्ये ती आपल्याच घरामध्ये आढळून आली आहे. या घटनेनं देशभरात खळबळ उडाली आहे. द सनने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार मिरेला नावाची ही 15 वर्षांची मुलगी 1998 साली आपल्या घरातून अचानक बेपत्ता झाली होती, मात्र ती बेपत्ता झाली नव्हती तर तिला तिच्याच घरात एका रूमध्ये कैद करून ठेवण्यात आलं होतं, जेव्हा पण शेजारी आणि नातेवाईक तिच्या आई वडिलांना या मुलीबद्दल विचारत तेव्हा ते त्यांना ती हरवल्याचं खोटं सांगत होते, तब्बल 27 वर्ष ही मुलगी एकाच खोलीमध्ये बांधलेल्या अवस्थेमध्ये होती, तीची हालत एवढी खराब झाली होती, की तिचे हातपाय जिवंतपणीच सडायला लागले होते, जर अजून थोडा उशिर झाला असता तर या महिलेचा मृत्यू झाला असता असं डॉक्टरांनी सांगितलं.
अशी आली घटना समोर
दरम्यान या मुलीला ज्या फ्लॅटमध्ये कैद करून ठेवण्यात आलं होतं, त्या सोसायटीमध्ये काही तरी समस्या निर्माण झाली होती, ती दूर करण्यासाठी या मुलीचे आई-वडील ज्या फ्लॅटमध्ये राहतात त्या फ्लॅटमध्ये जाणं गरजेचं होतं. मात्र ते कोणालाही आपल्या फ्लॅटमध्ये प्रवेश देत नव्हते, अखेर पोलिसांना बोलवावं लागलं, पोलीस या फ्लॅटमध्ये शिरताच चांगलेच हादरले, त्यांना एका अंधाऱ्या खोलीत एक महिला बांधून टाकलेल्या अवस्थेमध्ये दिसली, संपूर्ण प्रकार समोर येताच पोलिसांना प्रचंड धक्का बसला, त्यानंतर या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र अजून हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही की या मुलीला त्यांनी नेमकी एवढी भयानक शिक्षा का दिली, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.