AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका हाताचा पंजा तुटला, दुसरा हात अर्धा कापला, तरीही आरोपीला जामीन… नातेवाईकांचा थेट पोलीस ठाण्यासमोरच आक्रोश; पिंपरीत काय घडलं?

पिंपरी चिंचवडमध्ये किरकोळ वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाला आहे. यात तरुणाच्या हाताच्या पंजाचे दोन तुकडे झाले आहेत. मात्र यानंतर लगेच आरोपींना जामीनही मिळाला.

एका हाताचा पंजा तुटला, दुसरा हात अर्धा कापला, तरीही आरोपीला जामीन... नातेवाईकांचा थेट पोलीस ठाण्यासमोरच आक्रोश; पिंपरीत काय घडलं?
Pimpri Crime
| Updated on: Jun 25, 2025 | 6:21 PM
Share

गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यातील गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये किरकोळ वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाला आहे. यात तरुणाच्या हाताच्या पंजाचे दोन तुकडे झाले आहेत. मात्र यानंतर लगेच आरोपींना जामीनही मिळाला. यामुळे संतप्त नातेवाईकांनी पिंपरी चिंचवडमधील वाकड पोलिस स्टेशन समोर आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या घटेनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मिळालेल्या माहितीनुसार, डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या राहुल कणघरे याचे घराशेजारी राहणाऱ्या रोहनसोबत पूर्वीचे वाद होते. त्यामुळं दोघांमध्ये नेहमी खटके उडायचे. रोहन अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टीतून भांडण करायचा. चार दिवसांपूर्वीही दोघांमध्ये असाच वाद झाला होता. या रागातून रोहनने त्याचे मित्र शुभम आणि प्रशांतच्या मदतीने राहुलला संपवण्याचा कट रचला.

घरात बसलेल्या राहुलला विश्वासात घेऊन आरोपींनी बाहेर बोलावलं. ते थेरगाव येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यानशेजारी आले, तिथं दोन्ही मित्रांनी राहुलला पकडले अन रोहनने शस्त्राने डोक्याच्या दिशेने वार केला. राहुलने डोक्यावरचा वार चुकवण्यासाठी हात मध्ये घातला. यात डावा पंजा शरीरापासून वेगळा झाला तर उजवा पंजा अर्धा कापला गेला.

याप्रकरणी वाकड पोलिसांनी रोहन निमज, शुभम पवार आणि प्रशांत सकट या तिघांना बेड्या ठोकल्या. मात्र हे प्रकरण इतकं गंभीर असताना घटनेच्या दुसऱ्या दिवशी तिन्ही आरोपींना जामीन मिळाला. यामुळे राहुलचे नातेवाईक संतप्त झाले असून त्यांनी वाकड पोलिस स्टेशनसमोर आंदोलन केले.

यानंतर वाकड पोलिसांनी नव्या कायद्यामुळं जामीन मिळाल्याचा दावा केला. आता या तिघांना पुन्हा एकदा अटक करण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयाकडे मागणी करणार असल्याचं वाकड पोलिस म्हणाले. त्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केली आहे. मात्र आता अटक करण्याची परवानगी मिळेपर्यंत हे तिन्ही आरोपी पसार होणार तर नाहीत, याची खबरदारी पोलीस घेणार का ? याकडे ही सर्वांचं लक्ष लागले आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.