70 वर्षांचा प्रियकर, 50 वर्षांची प्रेयसी; कपलला रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी पकडलं, ओळख पटताच उडाली खळबळ

मोठी बातमी समोर येत आहे, संशय आला म्हणून रेल्वे पोलिसांनी एका कपलला पकडे. मात्र त्यांची ओळख पटताच पोलिसांना प्रचंड धक्का बसला आहे.

70 वर्षांचा प्रियकर, 50 वर्षांची प्रेयसी; कपलला रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी पकडलं, ओळख पटताच उडाली खळबळ
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 14, 2025 | 6:13 PM

संशय आला म्हणून रेल्वे पोलिसांनी एका कपलला पकडले. मात्र त्यांची ओळख पटताच पोलिसांना प्रचंड धक्का बसला आहे. पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतलं आहे, त्यातील पुरुषाचं वय 70 वर्ष तर महिलेचं वय 50 वर्ष आहे, रेल्वे स्टेशनवर फिरत असताना पोलिसांना या दोघांचा संशय आला, संशय आल्यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. या चौकशीमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे काही दिवसांपूर्वी या महिलेच्या पतीची हत्या झाली होती, त्या प्रकरणात या दोघांचा शोध सुरू होता. अखेर पोलिसांनी त्यांना अटक केलं आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पंजाबच्या अमृतसरमधील बुटारी आणि ब्यास रेल्वे स्टेशनच्या दरम्यान रेल्वे रुळावर पोलिसांना एक मृतदेह आढळून आला होता. कश्मीर सिंह असं या व्यक्तीचं नाव होतं. मृतदेह रेल्वे रुळावर सापडल्यानं या घटनेबाबत गूढ वाढलं होतं. मात्र घटनेच्या दोन महिन्यांनंतर अखेर या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

कश्मीर सिंह हा पंजाबमधील निक्का रय्या गावचा रहिवासी आहे, त्याची पत्नी बलविंदर कौर उर्फ ​​बिंद्रो वय 50 वर्ष हिचे अमर सिंह वय 70 वर्ष याच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. मात्र तिचा पती प्रेमात अडथळा ठरत असल्यामुळे या दोघांनी मिळून कश्मीर सिंह याची हत्या केली. त्याच्यावर धारदार हत्यारानं वार करण्यात आले. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकून देण्यात आला. बलविंदर कौरचा प्रियकर अमर सिंह हा दियालगढ गावचा रहिवासी आहे. या प्रकरणात पोलिसांना सुरुवातीपासूनच कश्मीर सिंह यांच्या पत्नीवर संशय होता.

त्यानंतर या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी संशय आला म्हणून एका कपलला अटक केली, ते कपल दुसरं तिसर कोणी नसून बलविंदर कौर उर्फ ​​बिंद्रो आणि अमर सिंह हे होते. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी हत्येची कबुली दिली असून, त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.