दोन महिलांनी उघडला कॅफे, दिवसा करायच्या मेहनत, सायंकाळ होताच बेसमेंट सुरु व्हायचा भलताच प्रकार
आजकाल तरुणांना आकर्षित वाटेल असे इंटेरियर करुन गावागावात आता कॅफे, क्लब आणि लाऊंज सुरु झाले आहेत. परंतू एका कॅफ बार मध्ये पोलिसांनी स्थानिकांच्या तक्रारी वरुन रेड टाकली तर तेथे भलतेच धंदे सुरु होते.

आजकालची तरुण पिढी चिल करण्यासाठी निवांत जागांचा शोध घेत असतात. जेथे धावपळ आणि रोजचे टेन्शन नसते असे कॅफे, क्लब आणि लाऊंज आजकल छोट्या शहरात देखील उघडले जात आहेत. या ठिकाणांवर तुम्हाला तरुण पिढी चंगळ करीत असल्याचे दिसेल. याचा फायदा घेत अनेक गल्ल्यांमध्ये असे बार आणि लाऊंज सुरु झालेले आहेत. पोलिसांनी एका हुक्का बारवर रेड टाकली आणि तेरा जणांना अटक केली. येथे हुक्का बारच्या नावाखाली भलतेच धंदे सुरु होते…
उत्तर प्रदेशातील बरेलीत पाच हुक्का बार होते. यातील एक महिला नेत्याच्या नावाने होता. या महिलेने आपल्या मैत्रिणीच्या सोबत कॅफे उघडला होता. जेथे फ्लेवर हुक्का ओढायला तरुणांची गर्दी होत होती. या फ्लेवर हुक्क्यात नशा येणार पदार्थ टाकले जात होते. त्यामुळे तरुणांना नशा यायची. पोलिसांना पाच हुक्का बार वर कारवाई करीत तेरा लोकांना अटक केली. यात दहा पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. पोलिसांना स्थानिकांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई केली.
बेसमेंटमध्ये चालायचा धंदा
या विभागात पाच हुक्का बार होते.त्यात एका कॅफेत ग्राऊंड फ्लोअरला चहा – कॉफी दिली जायची.परंतू बेसमेंटमध्ये भलताच धंदा चालायचा. येथे कस्टमरना दारु पासून ते फ्लेवर्ड हुक्का दिला जायचा. तसेच अल्पवयीन तरुण आणि तरुणींना यथे प्रवेश देऊन नशा चाखायला दिली जात होती. याच्याकडे हुक्का बारचे कोणतेही लायसन्स नव्हते. पोलिसांनी कारवाई करीत हुक्काबारचे सर्व साहित्य जप्त केले आणि दोन महिलांसह स्टाफला अटक केली आहे.
अफरा तफरी माजली
पोलिसांनी बेसमेंटमध्ये प्रवेश करताच अफरा तफरी माजली. आजूबाजूच्या लोकांनी या कॅफेबाबत तक्रार केली होती. पोलिसांना ग्राहकांना समज देऊन सोडले परंतू स्टाफला अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत अनेक बाबी उघड झाल्या आहेत.या लोकांचा व्हॉट्सअप ग्रुपही असून त्यावर ऑर्डरकरुन हुक्का घरपोच मागविण्याची सोय होती. पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
