फार्म हाऊसमध्ये चालला होता विचित्र खेळ! आत 18 मुलं-10 मुली, बाहेर उभ्या होत्या महागड्या गाड्या.. तेव्हात अचानक…

पोलिसांनी रविवारी रात्री मोठी कारवाई करत 18 मुलं आणि 10 मुलींना अटक केली आहे. हे सर्व गोगुंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या दोन फार्म हाऊसमध्ये घडले आहे. या फार्म हाऊसमध्ये रेव्ह पार्टी आणि वेश्यावृत्तीचा धंदा चालत होता. पोलिसांनी त्यांच्याकडून अनेक आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या आहेत.

फार्म हाऊसमध्ये चालला होता विचित्र खेळ! आत 18 मुलं-10 मुली, बाहेर उभ्या होत्या महागड्या गाड्या.. तेव्हात अचानक...
Crime
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 10, 2025 | 12:47 PM

सध्याची तरुणपीढी ही कधी काय करेल याचा नेम नाही. देशभरात व्यसनाधीन तरुणांची संख्या वाढत चालली आहे. अनेक विचित्र घटना सतत समोर येत असतात. उदयपूरमध्ये असाच विचित्र प्रकार घडला आहे. पोलिसांनी 18 मुलं आणि 10 मुलींना अटक केली आहे. हे सर्व गोगुंदा परिसरातील दोन फार्म हाऊसमध्ये बंद होते. या दोन्ही फार्म हाऊसबाहेर लक्झरी कार पार्क केल्या होत्या. आजूबाजूला डीजेचा आवाज येत होता. आत अनेकजण असल्याचे बाहेरुन दिसत होते. आता नेमकं चालू तरी काय आहे? असा प्रश्न आजूबाजूच्या लोकांना पडला होता. सूत्रांकडून पोलिसांना माहिती मिळताच ते फार्महाऊटवर पोहोचले. त्यानंतर जे समोर आले ते पाहून सर्वांना धक्का बसला.

नेमकं काय घडलं?

उदयपूरमधील गोगुंदा येथी एका फार्म हाऊसमध्ये रेव्ह पार्टी चालू होती, तर दुसऱ्यामध्ये वेश्यावृत्तीचा धंदा सुरू होता. गुप्तचराकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी रविवारी मध्यरात्री तिथे छापा टाकला तेव्हा एकच खळबळ उडाली. अटक करण्यात आलेल्या मुली राजस्थानच्या नाहीत, त्यांना बाहेरून बोलावलं गेलं होतं.

वाचा: महाभंयकर! ड्रग्जच्या पैशांसाठी अनेक पुरुषांसोबत शरीरसंबंध.. तरुणीमुळे 19 जणं एचआयवी पॉझिटीव्ह

काय म्हणाले पोलिस?

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, वेश्यावृत्तीच्या काळ्या धंद्याबाबत बऱ्याच तक्रारी येत होत्या. यावर पोलिसांनी त्यांच्या गुप्तचरांना सक्रिय केलं. रविवारी पोलिसांना परिसरातील दोन फार्म हाऊसवर रेव्ह पार्टी आणि इतर गैरकृत्य होत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी पूर्ण तयारीनिशी रात्री तिथे धडक दिली. पोलिसांनी दोन्ही फार्म हाऊसवर एकाच वेळी छापा टाकला. पोलिस आत पोहोचले तेव्हा तिथल्या परिस्थितीने त्यांचेही होश उडाले.

पोलिसांनी दोन्ही ठिकाणांहून 18 मुलं आणि 10 मुलींना अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात समोर आलं की, वेश्यावृत्तीसाठी या मुलींना बाहेरून बोलावलं गेलं होतं. पोलिसांनी ही कारवाई माताजी खेडा येथील पियाकल प्रियांका पीपी फार्म हाऊस आणि खुमानपुरा येथील द स्काय साइन हॉलिडे फार्म हाऊस येथे केली. या कारवाईत एका एनआरआयलाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 3,20,000 रुपयांचे डॉलर जप्त केले आहेत.