
अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका निवृत्त DySP यांच्या मुलीचा विवाह एका सुक्षित कुटुंबात झाला होता. तिचा पती डॉक्टर, सासरे प्रोफेसर आहेत. मात्र सासरच्या कुटुंबाकडून मिळालेल्या वागणुकीमुळे तिने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सासऱ्याने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली होती. एकदा तर सर्व मर्यादा ओलांडत त्यांनी अर्धे कपडे घालून ये, मी तुझ्यासोबत झोपते असे म्हटले होते. तसेच डॉक्टर पतीचा देखील तिच्या वडिलांच्या संपत्तीवर डोळा असल्याचे म्हटले आहे.
नेमकं प्रकरण काय?
ही घटना कर्नाटकातील नेलमंगला येथे घडली आहे. निवृत्त DySP यांची मुलगी अनीताने पती डॉक्टर गोवर्धन आणि सासरे प्रोफेसर नगराजू यांच्यावर हुंडा छळ, अश्लिल टिप्पण्या आणि शारीरिक छळ असे गंभीर आरोप लावले आहेत. अनीताचे लग्न २ नोव्हेंबर २०२३ रोजी झाले होते. तिच्या वडिलांनी लग्नात सुमारे २५ लाख रुपये, सोने, चांदी आणि इतर खर्च केले होते. मात्र अनीताचा आरोप आहे की लग्नाला अवघे १५ दिवस झाल्यानंतर तिच्या पतीने माहेरच्या मालमत्तेची आणि भाड्याच्या उत्पन्नातील हिस्सा मागायला सुरुवात केली. पतीचा कथित दबाव होता की तिने वडिलांच्या मालमत्तेतून पैसे आणावेत जेणेकरून तो नोकरी सोडून नर्सिंग होम सुरु करु शकेल. तसेच अनीताने सासऱ्यांनी केलेल्या अश्लील मागण्यांचा देखील खुलासा केला आहे.
काय होती सासऱ्याची मागणी?
अनीताने सर्वात गंभीर आरोप सासऱ्यावर केले आहेत. FIR नुसार, प्रोफेसर नगराजू केवळ अश्लील टिप्पण्या करत नव्हते तर शारीरिकदृष्ट्याही तिला त्रास देत होते. अनीताने आपल्या तक्रारीत सासऱ्यावर अश्लील टिप्पण्या केल्याचे आरोप केले आहेत. अनीताने सांगितले की सासरे तिच्यावर चुकीच्या टिप्पण्या करायचे. उदाहरणार्थ, ‘लग्नाला इतके महिने झाले, गुड न्यूज का नाही?’, ‘माझा मुलगा तुझ्यासोबत संबंध ठेवतो की नाही? नाही तर मीच येतो.’ याशिवाय अनीताने सांगितले की सासऱ्याने तिला असेही म्हटले, ‘मॉडर्न मुलींसारखे अर्धे कपडे घालून माझ्यासमोर ये.’
‘घराची गोष्ट आहे, अॅडजस्ट कर’
अनीताचे म्हणणे आहे की जेव्हा तिने याचा विरोध केला तेव्हा पती आणि सासूने उलट तिलाच समजावले की ‘घरातली गोष्ट आहे. त्यामुळे तुच थोडे अॅडजस्ट कर.’ सतत होणाऱ्या मानसिक, आर्थिक आणि शारिरीक छळामुळे कंटाळून अनीताने नेलमंगला पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी पती, सासरा आणि सासूच्या विरोधात हुंडा छळासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाची चौकशी सुरू आहे.