Tractor Accident : ट्रॅक्टर पुलावरून ओढ्यात पलटी, एकाचा जागीचं मृत्यू, ग्रामस्थांनी सांगितलं कारण…

उसाने भरलेला ट्रॅक्टर दिसला की, इतर वाहनं काही अंतर ठेऊन चालवली जातात. त्याचबरोबर अधिक लोड असल्यामुळे सुध्दा अनेक ट्रॅक्टरचे अपघात झाले आहेत. पुण्यातला अपघात...

Tractor Accident : ट्रॅक्टर पुलावरून ओढ्यात पलटी, एकाचा जागीचं मृत्यू, ग्रामस्थांनी सांगितलं कारण...
PUNE BHOR TRACTOR ACCIDENT
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 03, 2023 | 7:41 AM

विनय जगताप, भोर : पुणे (PUNE) जिल्ह्यातील भोर (BHOR) परिसरात ट्रॉलीसह ट्रॅक्टर (TRACTOR ACCIDENT) वळवत असताना चालकाचा ताबा सुटला, त्यानंतर ट्रॅक्टर पुलावरून ओढ्यात पलटी होवून चालकाचा जागीचं मृत्यू झाला. पुण्याच्या भोर तालुक्यातील भोंगवली गावच्या हद्दीत घडली घटना असल्याची माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे. जालिंदरसिंग गुलजार असं मृत्यू झालेल्या 22 वर्षीय चालकाच नाव आहे. मुळचा पंजाबचा असलेला जालिंदरसिंग, ठेकेदार गणेश दारवटकर यांच्याकडे ट्रॅक्टर चालक म्हणून करत होता. किकवीच्या राजगड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांकडून पुढील तपास सुरू आहे. जिथं ट्रॅक्टर वळवला जात होता, तिथं रस्ता अरुंद असल्यामुळे ट्रॅक्टर पलटी झाल्याची ग्रामस्थांची चर्चा आहे.

नेमकं काय झालं

भोर तालुक्यातील भोंगवली गावच्या हद्दीत अरुंद रस्त्यात ट्रॉलीसह ट्रॅक्टर वळवत असताना चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर ट्रॅक्टर पुलावरून ओढ्यात पलटी झाला. त्यावेळी ट्रॅक्टर उचलून पडल्याने चालकाचा जागीचं मृत्यू झाला. घटना पुण्याच्या भोर तालुक्यातील भोंगवली गावच्या हद्दीत घडली, अपघात झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्यानंतर तिथं बघ्यांची अधिक गर्दी झाली होती. जालिंदरसिंग गुलजार मृत्यू झालेल्या 22 वर्षीय चालकाच नाव आहे. मुळचे पंजाबचे असलेले जालिंदरसिंग ठेकेदार गणेश दारवटकर यांच्याकडे ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होते. पुढील तपास किकवीच्या राजगड पोलीस स्टेशनचे कर्मचारी करत आहेत.

उसाने भरलेला ट्रॅक्टर दिसला की…

महाराष्ट्रात अनेक सहकारी साखर कारखाने बंद झाले आहेत. तर काही कारखाने अद्याप सुरु आहेत. त्यामुळे रस्त्यात अनेक ट्रॅक्टरचे अपघात झाल्याचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळाले. उसाने भरलेला ट्रॅक्टर दिसला की, इतर वाहनं काही अंतर ठेऊन चालवली जातात. त्याचबरोबर अधिक लोड असल्यामुळे सुध्दा अनेक ट्रॅक्टरचे अपघात झाले आहेत. पुण्यातला अपघात हा रस्ता अरुंद असल्यामुळे झाला असल्याचं लोकांची चर्चा आहे.