Pune Crime: मला एक पप्पी दे, हवं ते देतो; पुण्यात 73 वर्षीय थेरड्याकडून तरुणीचा विनयभंग

Pune Crime: पुण्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका खाजगी क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या 27 वर्षीय तरुणीने 73 वर्षीय थेरड्या विरोधात तक्रार केली आहे.

Pune Crime: मला एक पप्पी दे, हवं ते देतो; पुण्यात 73 वर्षीय थेरड्याकडून तरुणीचा विनयभंग
Pune Crime
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 06, 2025 | 2:12 PM

राज्यातील सांस्कृतिक शहर समजल्या जाणाऱ्या पुण्यात सतत धक्कादायक घटना घडताना दिसत आहेत. तेथे दिवसेंदिवस महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुण्यातील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका 73 वर्षीय वृद्धाने खाजगी क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या 27 वर्षीय तरुणीचा विनयभंग केला आहे. या प्रकरणी तरुणीने विश्रामबाग रोड येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे.

पुणे शहरातील एका खासगी क्लिनिकमध्ये 3 जुलै 2025 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. 73 वर्षीय वृद्धाने क्लिनिकच्या रिसेप्शनवर एकट्या असलेल्या तरुणीशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

वाचा: ‘या’ झाडाला चिटकूनच बसतात विषारी साप, काय असतं कारण?

नेमकं प्रकरण काय?

सुरेशचंद चोरडिया (वय 73) असे आरोपी वृद्धाचे नाव आहे. तो रुग्ण म्हणून क्लिनिकमध्ये आला होता. त्या वेळी रिसेप्शनवर फक्त एक तरुणी उपस्थित होती. ही संधी साधून चोरडियाने तिच्याशी अश्लील वर्तन सुरू केले. त्याने थेट तरुणीच्या गालाला हात लावत “पप्पी दे” अशी मागणी केली. त्यानंतर खिशाकडे हात दाखवत, “माझ्याकडे पैसे आहेत, तुला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातो. तुला जे हवे ते मी देतो, पण तू मला पाहिजे ते कर,” असे अश्लील बोलून तिला त्रास दिला.

तरुणीने केली पोलिसात तक्रार

या अनपेक्षित आणि आक्षेपार्ह वर्तनामुळे घाबरलेल्या तरुणीने तात्काळ क्लिनिक सोडले आणि बाहेर पळ काढला. मात्र, चोरडियाने तिचा पाठलाग करत “उद्या क्लिनिकमध्ये आहेस का?” असा प्रश्न विचारून तिला पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे तरुणीला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. तिने धाडसाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत चोरडियाला अटक केली आहे. सध्या या घटनेचा तपास सुरू असून, आरोपीवर संबंधित कायदेशीर कलमांखाली कारवाई केली जाणार आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.