पुणे हादरलं! शरीर संबंधाला नकार दिल्याने महिलेला संपवलं, चेहरा केला विद्रुप, पुणे पोलिसांनी असा लावला शोध
Pune Crime News : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्याचं कानावर पडत होतं. मात्र पुण्यात एका महिलेला शरीर संबंध ठेवू न दिल्याने मारल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. पोलिसांनी आपली सूत्र हरवत आरोपींना मोठ्या शिताफिने पकडलं आहे.

पुणे : विद्येचं माहेघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शरीर संबंध ठेवण्यासाठी नकार दिल्याने महिलेला संपवल्याची थरकाप उडवणारी घटना समोर आलीये. बिबवेवाडी परिसरातील एका मंदिराजवळ महिलेचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी या प्रकरणाच्या खोलात जात तपास केल्यावर जे सत्य समोर आलंय त्याने पुणे हादरून गेलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
बिबवेवाडीमधील गोयला गार्डन समोर मृत महिलेचा पाल होता, ती काही आयुर्वेदिक औषधे विकत असल्याची माहिती आहे. 9 डिसेंबरला ती महिला नेहमीप्रमाणे आपल्या पालावर झोपायला आलेली. त्यावेळी आरोपी दारूच्या नशेत पालावर येत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करू लागले. महिलेने नकार दिल्याने आरोपीने तिथे असलेल्या रॉडने महिलेला मारत जाग्यावरच संपवलं. आरोपींनी गुन्हा लपवण्यासाठी वाईट कृत्य केलं. महिलेची ओळख न पटण्यासाठी त्यांनी तिच्या चेहऱ्यावर गंभीर घाव घातले.
पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी एका टुव्हिलर तपास करताना बिबवेवाडीपासून ते चाकणपर्यंत पोलिसांनी या तब्बल 250 सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. यानंतर पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली. रविसिंग चितोडिया आणि विजय मारूती पाटील अशी आरोपींची नाव आहेत. संशयित टुव्हिलरमुळे रविसिंग चितोडिया याचं नाव समोर आलं, त्याला नाशिक येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं. चौकशीदरम्याने त्याने विजय पाटील यांंच नाव घेतलं. पोलिसांनी त्याला पालघर येथून पकडलं. दोघांची कसून चौकशी केल्यावर दोघांनी गुन्हा कबूल केला.
दरम्यान, या घटनेची पुण्यात सर्वत्र चर्चा होत असलेली पाहायला मिळत आहे. शरीर सुखासाठी नराधमांनी महिलेला संपवलं. पुण्यात गुन्हेगारांना पोलिसांचा वचक राहिला आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा एकदा समोर आला आहे.
