AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग बघण्याआधीच पोटातल्या बाळासह पत्नीचा अपघाती मृत्यू, मानसिक धक्क्यातून पतीनेही उचलले टोकाचे पाऊल

रमेश कानसकर हे आपल्या गर्भवती पत्नीला नारायणगाव येथे दोन दिवसापूर्वी चेकअपसाठी घेऊन गेले होते. रुग्णालयातून परतत असतानाच डंपरखाली चिरडून पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

जग बघण्याआधीच पोटातल्या बाळासह पत्नीचा अपघाती मृत्यू, मानसिक धक्क्यातून पतीनेही उचलले टोकाचे पाऊल
मानसिक तणावातून व्यक्तीची आत्महत्याImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Nov 17, 2022 | 7:25 PM
Share

पुणे : गर्भवती पत्नीचा अपघाती मृत्यू जिव्हारी लागल्याने पतीनेही विषारी औषध घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची दुःखद घटना जुन्नर तालुक्यातील धोंडकरवाडी येथे घडली. रमेश नवनाथ कानसकर असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण जुन्नर तालुका हळहळला आहे. यामुळे आठ महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या संसाराचा आज करुण अंत झाला आहे.

रमेश कानसकर हे आपल्या गर्भवती पत्नीला नारायणगाव येथे दोन दिवसापूर्वी चेकअपसाठी घेऊन गेले होते. रुग्णालयातून परतत असतानाच डंपरखाली चिरडून पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

आपल्या पत्नीचा डोळ्यासमोर झालेला मृत्यू पतीच्या जिव्हारी लागला. यानंतर पतीनेही विषारी औषध घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

आठ महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

विद्या आणि रमेश यांचा आठ महिन्यांपूर्वीच जुन्नर येथे विवाह झाला होता. यानंतर ती चार महिन्यांची गर्भवती होती. त्यामुळे तिची डॉक्टरकडे तपासणी सुरू होती.

गर्भवती पत्नीला चेकअपसाठी रुग्णालयात घेऊन गेले होते

14 नोव्हेंबरला रमेश आपली पत्नी आणि सासूला दुचाकीवरून घेऊन डॉक्टरांकडे तपासणी करून घरी जात होता. वारुळवाडी येथे येताच ऊस घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा धक्का दुचाकीला लागला. यामुळे विद्या खाली पडली तिच्या डोक्यावरून ट्रॉलीचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

पत्नीच्या मृत्यूनंतर पती तणावात होता

पत्नीच्या मृत्यूनंतर रमेश तणावाखाली होता. तसेच त्याने मागच्या दोन दिवसांपासून अन्न आणि पाणी देखील सोडले होते. त्याने बुधवारी रात्रीच्या सुमारास विषारी औषध घेऊन स्वतःला संपवले.

आठ महिन्यांपूर्वीच सुरू झालेल्या संसाराचा अरुंद आणि नादुरुस्त रस्त्याने बळी घेतला असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?