सहा वर्षांच्या चिमुरड्यावर माकडाचा हल्ला, किल्ले शिवनेरीवरील घटना

| Updated on: Nov 05, 2022 | 4:04 PM

मुंबई येथे राहणारा सहा वर्षाचा मुलगा हा जुन्नर तालुक्यात आपल्या मामाकडे दिवाळीच्या सुट्टीला आला होता. सुट्टी सुरू असल्याने तिघेही शिवनेरी या ठिकाणी फिरण्यासाठी आले होते.

सहा वर्षांच्या चिमुरड्यावर माकडाचा हल्ला, किल्ले शिवनेरीवरील घटना
दिल्लीत अल्पवयीन मुलाची आत्महत्या
Image Credit source: Google
Follow us on

पुणे : शिवनेरी किल्ल्यावरून खाली उतरत असताना किल्ल्यावरील महादरवाजा जवळ माकडाने एका सहा वर्षाच्या मुलावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात सहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामुळे किल्ल्यावर आलेले पर्यटक काही वेळ भयभीत झाले होते. जुन्नर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी येथे अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत असतात.

जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असणारे पुरातन वस्तू खात्याचे कर्मचारी गोकुळ दाभाडे यांनी त्या मुलाला रुग्णालयात दाखल केले.

दिवाळीत मामाकडे आला होता मुलगा

मुंबई येथे राहणारा सहा वर्षाचा मुलगा हा जुन्नर तालुक्यात आपल्या मामाकडे दिवाळीच्या सुट्टीला आला होता. सुट्टी सुरू असल्याने तिघेही शिवनेरी या ठिकाणी फिरण्यासाठी आले होते. दिवसभर किल्ल्यावर फिरले.

हे सुद्धा वाचा

किल्ल्यावरुन परतत असताना एका पर्यटकाने आपल्या सोबत कुत्रे आणले होते. त्या कुत्र्याच्या मागेमागे माकड देखील आले. मात्र महादरवाजाजवळ आल्यावर जवळून जात असलेल्या मुलावर माकडाने हल्ला चढवला. त्याच्या हाताचा लचका तोडला. त्याच्या हाताला सात टाके पडले आहेत.

या घटनेने एकच खळबळ उडाली होती. आरडा ओरडा सुरू होता. नंतर माकडाला लोकांनी पळवून लावण्यात आले. त्यानंतर मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना येताना स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

जुन्नर ग्रामीण रुग्णालय सुविधांची वानवा

जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर राज्यभरातून पर्यटक फिरण्यासाठी येतात. या भागात बिबट्या प्रवन क्षेत्र आहे. अनेक प्राणी येथे आहेत, मात्र प्राण्यांच्या हल्ल्यात कोणी जखमी झालं किंवा कुणाला काही त्रास झाला तर अद्ययावत सुविधा उपलब्ध नाहीत.

माकडाने मुलाला जखमी केले तेव्हा त्याला उपचारासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती. त्या चिमुकल्या पर्यटकाला मंचर येथील रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यामुळे पर्यटन असलेल्या जुन्नरमधील रुग्णालयात सुविधांचा वानवा पहायला मिळत आहे.