AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayush Komkar Murder Case: नातवाचा खून का करू? आजोबा नेमकं काय म्हणाले? त्या दिवशी कुठे होते? आयुष कोमकर प्रकरणाच्या सुनावणीत काय घडलं?

आयुष कोमकर हत्या प्रकरणातील 13 पैकी 8 आरोपींना आज पुण्यातील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांसह पोलिसांनीही युक्तिवाद केला. आज कोर्टात नेमकं काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

Ayush Komkar Murder Case: नातवाचा खून का करू? आजोबा नेमकं काय म्हणाले? त्या दिवशी कुठे होते? आयुष कोमकर प्रकरणाच्या सुनावणीत काय घडलं?
Aayush Komkar Murder Case
| Updated on: Sep 09, 2025 | 6:57 PM
Share

Pune Crime: पुण्यातील गुन्हेगारीत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी आयुष कोमकर या तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आयुष हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणातील 13 पैकी 8 आरोपींना आज पुण्यातील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांसह पोलिसांनीही युक्तिवाद केला. आज कोर्टात नेमकं काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

मी माझ्या नातवाचा खून का करू? – बंडू आंदेकर

आरोपी बंडू आंदेकर यांच्या वकिलांनी सुरुवातीला रिमांड रिपोर्ट पाहण्यासाठी न्यायाधीशांकडे वेळ मागितला. आरोपी बंडू आंदेकर यांनी कोर्टात सांगितले की, ‘आम्हाला या प्रकरणात गोवलं जात आहे, हत्येच्या वेळी आम्ही केरळमध्ये होतो. मी माझ्या नातवाचा खून का करू? तो माझा वैरी नाही. वनराज अंदेकर नगरसेवक होता. तो युथ आईकोन होता. त्यामुळे त्याचा खून केला असावा.’

पोलिसांनी युक्तीवादात काय म्हटलं?

यानंतर पोलिसांनी युक्तिवाद करताना पोलिसांनी म्हटले की, आंदेकर कुटुंबातील सदस्यांनी कट रचून हत्या केली आहे. अमन पठाण आणि यश पाटील यांनी येथे फक्त बंडू आणि विष्णू आंदेकरच अशा घोषणा दिल्या. अन्य आरोपींना अटक करण्यासाठी या 8 आरोपींकडून माहिती घ्यायची आहे. बंदुक कुठून आणली याचा तपास करायचा आहे. वर्चस्व सिद्ध करण्यासाठी हा गुन्हा केला. या प्रकरणातील सर्व आरोपींवर अनेक गुन्हे दाखल आहेत. ज्यांनी हत्या केली त्याची कपडे जप्त करायचे आहे. हे टोळी युद्ध आहे त्यामुळे 7 दिवस पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी यावेळी पोलिसांनी केली.

सर्व आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी

सरकारी वकीलांनी युक्तिवाद करताना म्हटले की, 1 सप्टेंबर 2024 रोजी वनराज अंदेकरचा खून झाला. त्याचा बदला घेण्यासाठी या मुलाचा खून करण्यात आला. हे सगळं टोळी युद्ध आहे. याबाबत सखोल तपास करायचा आहे, त्यामुळे 7 दिवसांची पोलीस कोठडी हवी आहे. यानंतर कोर्टानेबंडू आदेकरसह इतर सर्व आरोपीना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता 15 तारखेला सर्व आरोपीना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...