AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘…ची बायको पॉर्नस्टार सारखी दिसतेय’, 140 जणांना मेल, पुण्यात काय चाललंय?

पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेच्या आडनावाचा उल्लेख करुन तिला थेट पॉर्नस्टार म्हणत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात कारवाई केली आहे.

'...ची बायको पॉर्नस्टार सारखी दिसतेय', 140 जणांना मेल, पुण्यात काय चाललंय?
Image Credit source: google
| Edited By: Chetan Patil | Updated on: Aug 17, 2023 | 10:51 PM
Share

पुणे | 17 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्रात महिलांचा आदर केला जातो. आपण महिलांना देवी मानतो. पण समाजातील विकृत प्रवृत्ती कमी होताना दिसत नाही. विशेष म्हणजे ही विकृती कुठेही असू शकते. मग ती रस्त्यावर, गाव-खेड्यात किंवा भल्या मोठ्या शहरात, हाय प्रोफाईल अशा सोसायटीतही असू शकते. त्यामुळे अशा प्रवृत्तींना ठेचायला हवं. कारण ही प्रवृत्ती ठेचली नाही तर वारंवार मुली आणि महिलांच्या विनयभंगाच्या किंवा अत्याचाराच्या घटना समोर येत राहतील. पुण्यात असाच एक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पुण्यातील अतिशय हायप्रोफाईल अशा सोसायटीत हा प्रकार समोर आलाय. पुण्याच्या कोंढवा परिसरात हा धक्कादायक प्रकार समोर आला.

कोंढवा परिसरात एका हायप्रोफाईल सोसायटीत एका आरोपीने एक अतिशय विकृत कृत्य केलं. या आरोपीने सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेच्या आडनावाचा उल्लेख करत संबंधित महिलेला पॉर्नस्टार म्हणत तिचा विनयभंग केला. विशेष म्हणजे आरोपीने “…ची बायको पॉर्नस्टार सारखी दिसतेय”, असा ई-मेल सोसायटीच्या 140 सदस्यांना केला.

नेमकं प्रकरण काय?

कोंढवा भागात असणाऱ्या सोसायटीमध्ये एका महिलेला पॅार्नस्टार म्हणून संबोधन करत विनयभंग करण्यात आला. महिलेच्या बदनामी संदर्भात सोसायटीमध्ये राहणाऱ्या सगळ्यांना ई-मेल आले. याप्रकरणी एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून कोंढवा पोलिसांनी शेखर बाबूलाल धोत्रे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीने पीडितेला धमकावलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या आरोपी शेखर धोत्रे याने “…ची बायको पोर्न एक्ट्रेस सारखी दिसते, पॉर्न ऍक्टरेस आली नाही का चालायला?” असे अश्लील वाक्य वापरत सोसायटीमधील 140 सदस्यांना मेल पाठवला.

फिर्यादी यांनी आरोपीस या संदर्भात जाब विचारण्यास गेलं असता आरोपीने त्यांना धमकी दिली आणि जे करायचं ते कर असं धमकावलं. हा सगळा प्रकार त्या महिलेने पोलिसांना सांगितला असता पोलिसांनी धोत्रे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिली.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?