AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात दर्शना पवार प्रकरणाची पुनरावृत्ती, प्रेम प्रकरणातून प्रेयसीची गोळ्या घालून हत्या

MPSC pass Darshana Pawar and Vandana Dwivedi | पुणे शहरात एमपीएससी पास तरुणी दर्शना पवार हिची हत्या काही महिन्यांपूर्वीच झाली होती. आता पुन्हा प्रेमप्रकरणातून आयटी अभियंता असणाऱ्या युवतीची तिच्या प्रियकराकडून हत्या झाली आहे. दोन्ही प्रकरणे सारखेच आहेत.

पुण्यात दर्शना पवार प्रकरणाची पुनरावृत्ती, प्रेम प्रकरणातून प्रेयसीची गोळ्या घालून हत्या
वंदना द्विवेदीआणि दर्शना पवारImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Jan 29, 2024 | 3:52 PM
Share

रणजित जाधव, पुणे दि.29 जानेवारी 2024 | पुणे शहरात एमपीएससी पास तरुणी दर्शना पवार हिची हत्या काही महिन्यांपूर्वीच झाली होती. त्यानंतर पुन्हा पुणे शहरात त्याच कारणामुळे खून झाला आहे. प्रेयसी सोडून जाईल, लग्न करणार नाही, यामुळे आयटी अभियंता तरुणीची हत्या करण्यात आली. लॉजमध्ये प्रेयसीवर पाच गोळ्या मारल्यानंतर तिचा प्रियकर घटनास्थळावरुन प्रसार झाला. परंतु पाच गोळ्यांचा आवाज लॉजमधील कोणाला आला नाही. आयटी हब हिंजवडीत एका आयटी अभियंत्या युवतीला गोळ्या मारुन तिचा प्रियकर मुंबईत निघून गेला. परंतु मुंबई पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

ती अभियंता तो ब्रोकर

पुणे शहरातील एका मोठ्या आयटी कंपनीत वंदना द्विवेदी ही 26 वर्षीय तरुणी अभियंता म्हणून कार्यरत होती. तिची तिच्या गावातील म्हणजे लखनऊमधील युवक ऋषभ निगम याच्याशी ओळख होती. दोघे काही वर्षांपासून प्रेम संबंधात गुंतले होते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये वंदना आणि ऋषभ यांच्यात दुरावा निर्माण झाला होता.

दर्शना पवार हिचा प्रियकर राहुल हंडोरे तिच्या गावातील होता. तो तिच्याशी लग्न करण्याची मागणी करण्याची मागणी करत होता. त्या पद्धतीने वंदनाचा प्रियकर ऋषभ यालाही तिच्याशी लग्न करायचे होते. परंतु वंदना सॉफ्टवेअर इंजीनियअर होती. ऋषभ मात्र ब्रोकर होता. वंदना आपल्याला सोडून जाईल, असे त्याला वाटत होते. त्यामुळे त्याने तिला पाच गोळ्या झाडत तिची हत्या केली आणि तो पसार झाला. दर्शना पवार एमपीएससी पास तर हिचा प्रियकर राहुल हंडोरे याला एमपीएससीत अपयश आले होते. दर्शना लग्न करत नसल्याने त्याने तिला संपवले. त्याचा कारणामुळे वंदना याला ऋषभ याने संपवले.

मृतदेह लॉजमध्ये सापडल्याने खळबळ

वंदनाचा मृतदेह एका लॉजमध्ये सापडल्याने खळबळ उडाली. तिची हत्या करणाऱ्या प्रियकराला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रेम संबंधांतून हा प्रकार घडल्याचे त्याने सांगितले. तसेच ऋषभ याला वंदनाचे इतर प्रेम संबंध असल्याचा संशय ही होता. त्यामुळे ऋषभ याने वंदना हिला हिंजवडी मधल्या एका लॉजवर बोलवले आणि २७ तारखेला रात्री तिची पाच गोळ्या घालून हत्या केली.

आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.