AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime : नदीपात्रात अनोळखी मृतदेह आढळल्याने खळबळ, व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं?

नागरिकांना सकाळच्या सुमारास नदीत मृतदेह तरंगताना आढळला. मात्र या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नाही. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

Pune Crime : नदीपात्रात अनोळखी मृतदेह आढळल्याने खळबळ, व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं?
पुण्यात नदीपात्रात अनोळखी मृतदेह आढळला
| Edited By: | Updated on: Jul 27, 2023 | 5:27 PM
Share

पुणे / 27 जुलै 2023 : सांस्कृतिक शहर आणि विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात गुन्हेगारी सत्र वाढतच चालले आहे. शिवाजीनगर पुलाखाली नदीपात्रामध्ये अनोळखी मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या व्यक्तीची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. तसेच ही हत्या आहे की आत्महत्या? हे समजू शकलेलं नाही. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच सदर व्यक्तीने आत्महत्या केली की त्याची हत्या झाले हे स्पष्ट होईल.

पोलिसांपुढे गुन्ह्याची उकल करण्याचे मोठे आव्हान

शिवाजीनगर पुलाखाली आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह पाण्यावर तरंगताना काही जणांनी पाहिले. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. हा मृतदेह 55 ते 60 च्या वयाच्या पुरुषाचा आहे. त्याच्या डोक्याला मार लागलेला असून, गुडघे देखील खरचटलेले आहेत. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. या व्यक्तीची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

बुलढाण्यात शेतात अनोळखी मृतदेह आढळला

बुलढाण्यातही शेतात अनोळखी मृतदेह आढळला आहे. सदर व्यक्तीचा मृतदेह तेथे कसा आला? त्याची हत्या कुणी आणि कोणत्या कारणातून केली? याबाबत पोलीस तपास करत आहेत. गावातील लोकांनी सकाळी शेताजवळील रस्त्यावर हा मृतदेह पाहिल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.