AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nandurbar Crime : शेतीचा वाद टोकाला गेला, दोन गटात तुफान राडा, गोळीबारात दोन ठार

संपत्तीसाठी रक्ताच्या नात्याचाही लोकांना विसर पडतो. मग लोक काय करतील याचा नेम नाही. अशीच एक घटना नंदुरबारमध्ये घडली आहे.

Nandurbar Crime : शेतीचा वाद टोकाला गेला, दोन गटात तुफान राडा, गोळीबारात दोन ठार
शेतीच्या वादातून झालेल्या गोळीबारात दोन ठारImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jul 27, 2023 | 6:02 PM
Share

नंदुरबार / 27 जुलै 2023 : शहादा तालुक्यातील मलगाव गावात शेतीच्या वात चव्हाट्यावर आला आणि एकाच कुटुंबातील दोन गटात जुंपली. या वादातून दोन राऊंड फायर करण्यात आले. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच शहादा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून, सद्यस्थितीत गावात पूर्ण शांतता आहे. मात्र या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गावठी पिस्तुल आणि तलवारी कुठून आणल्या? याचा तपास पोलीस करत आहेत. अद्याप कुठल्याही आरोपीला अटक झाली नाही. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

एकाच कुटुंबातील दोन गटात वाद

मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरती असलेल्या मलगाव या गावात एका कुटुंबातील दोन गटात शेतीच्या वाद होता. याच शेतीच्या वादातून आज तुफान राडा झाला. या राड्यामध्ये गावठी पिस्तुलाचे 2 राउंड फायर झाले आहेत. यात एक जण जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अन्य पाच जण जखमी

मात्र घरगुती वादात थेट गावठी पिस्तुल काढून दोन राऊंड फायर केल्याने गावात एकच खळबळ उडाली. तसेच या वादात तलवारीने देखील वार करण्यात आले आहेत. या घटनेत एकूण पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना