AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime : एकतर्फी प्रेमातून तरुणीवर घरात घुसून हल्ला, पुणे हादरले !

सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्यात सतत महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक धक्कदायक घटना चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे.

Pune Crime : एकतर्फी प्रेमातून तरुणीवर घरात घुसून हल्ला, पुणे हादरले !
हुंड्यासाठी गर्भवती विवाहितेला जिवंत जाळले
| Updated on: Jul 29, 2023 | 6:17 PM
Share

पुणे / 29 जुलै 2023 : पुण्यात महिलांवरील अत्याचार थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. सतत या ना त्या कारणाने महिला अत्याचाराच्या बळी ठरत आहेत. पुन्हा एकदा तरुणीवर हल्ल्याची घटना उघडकीस आली आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर घरात घुसून ब्लेडने वार केल्याची घटना चिंचवड येथील आनंदनगर परिसरात घडली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरुन चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नाना जालिंदर गायकवाड असे 30 वर्षीय आरोपीचे नाव आहे. चिंचवड पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. वारंवार महिलांवर होणाऱ्या या अत्याचाराच्या घटना पाहता महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे.

काय घडलं नेमकं?

पीडित तरुणी आणि आरोपी दोघेही आनंदनगर झोपडपट्टीतील रहिवासी आहेत. आरोपीचे पीडितेवर एकतर्फी प्रेम होते. तरुणी एकदा कामावर जात असताना आरोपीने तरुणीला अडवून तिचा मोबाईल नंबर मागितला. मात्र तरुणीने नंबर दिला नाही यामुळे आरोपी चिडला. तरुणी आपल्या प्रेमसंबंधाला प्रतिसाद देत नसल्याने आरोपी संतापला आणि तिच्या घरात घुसला.

आरोपीने तरुणीच्या घरात घुसून तिच्या हातावर ब्लेडने वार केले. तसेच शिवीगाळ करत तिचा विनयभंगही केला. यानंतर तरुणीने चिंचवड पोलिसात धाव घेत सदर घटनेबाबत सांगितले. पोलिसांनी घटनेची नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे.

महिलांवरील अत्याचार रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान

दोन दिवसापूर्वी कर्ज फेडले नाही म्हणून पतीसमोर पत्नीवर बलात्कार केल्याची घटना घडली. त्यानंतर बँक अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचे उघडकीस आले. आता एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला झाल्याची घटना पुढे येत आहे. या सर्व घटना पाहता महिलांवरील अत्याचार रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....