कार्तिकी सोहळयाला पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला पिकअप; 2 वारकऱ्यांचा मृत्यू , 18 जखमी

खालापूर येथून पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या  दिंडीत अचानक भरधाव पिक अप गाडी शिरल्याने हा अपघात झाला.

कार्तिकी सोहळयाला पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला पिकअप; 2 वारकऱ्यांचा मृत्यू , 18 जखमी
Breaking News
Follow us
| Updated on: Nov 27, 2021 | 11:15 AM

पुणे – मावळ तालुक्यातून कार्तिकी एकादशीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीला मोठा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये 18  वारकरी जखमी झाले असून , दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. सकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे. खालापूर येथून ही पायी दिंडी आळंदीला निघाली होती, तेव्हा कान्हे फाटा येथे सकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

जखमी वारकऱ्यांवर उपचार सुरू खालापूर येथून पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या  दिंडीत अचानक भरधाव पिक अप गाडी शिरल्याने हा अपघात झाला. या अपघातात सविता वाळकू येरभ (वय 58), रा. उंबरे, रायगड व जयश्री आत्माराम पवार (वय 54), रा.भूतवली, जि रायगड या वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच वडगाव-मावळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पिक-अप चालकाला ताब्यात घेतले आहे. खालापूर येथून ही दिंडी आळंदीकडे निघाली होती. जखमी वारकऱ्यांवर कामशेतच्या महावीर हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत.

पार्थ पवार यांनीही केलं ट्विट

राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनीही ट्विट करत ‘ आळंदीकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीला  कामशेत(साते) गावाजवळ वाहनाची जोरदार धडक बसून,या दुःखद घटनेत 18 वारकऱ्यांना गंभीर इजा झाली आहेत. जखमी वारकऱ्यांची प्रकृती लवकर बरी होवो ही प्रार्थना.आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करू. नजीकच्या रुग्णालयात त्वरित उपचार सुरू करण्यात आले आहेत’ ही माहिती दिली आहे .

कार्तिक संजीवन समाधी सोहळ्याला उत्साहात सुरुवात ; महाराष्ट्रातून वारकरी आळंदीत दाखल

शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजीवर जोर, द्वैभाषिक धोरण लागू करण्याचे वर्षा गायकवाडांचे निर्देश

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 27 November 2021

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.