AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुन्हा दाखल झाल्यानंतर ड्युप्लिकेट सीएम यांचं स्पष्टीकरणही समोर! काय म्हणाले विजय माने? का दाखल झाला होता गुन्हा?

Duplicate Shinde Vijay Mane Video : नुकतीच विजय माने आणि एकनाथ शिंदे यांची भेटही झाली होती. त्यानंतर आता विजय माने यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर ड्युप्लिकेट सीएम यांचं स्पष्टीकरणही समोर! काय म्हणाले विजय माने? का दाखल झाला होता गुन्हा?
विजय माने, मुख्यमंत्री शिंदे सारखे दिसणारे म्हणून प्रसिद्धImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Sep 20, 2022 | 9:33 AM
Share

पुणे : ड्युप्लिकेट सीएम म्हणून (Duplicate Shinde) अवघ्या काही दिवसांतच विजय माने (Vijay Mane) व्हायरल झाले. सोशल मीडियामध्ये त्यांचे फोटो, व्हिडीओ ट्रेन्ड होऊ लागले. त्यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा (Pune Crime News) दाखल झाल्यानं आता नवा वाद छेडला गेलाय. याप्रकरणी अखेर विजय माने यांचदेखील स्पष्टीकरण समोर आलं आहे. मला माहीत नसताना माझे नकळत फोटो काढले गेले, कोणत्याही प्रकरणाची शहानिशा न करता माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असं विजय माने यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतीमा मलीन केली, असा आरोप विजय माने यांच्यावर करण्यात आला आहे. याच आरोपाखाली त्यांच्यावर पुणे पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतलाय. पोलिसांनी केलेले आरोप विजय माने यांनी मात्र फेटाळून लावलेत.

मी वेळोवेळी पोलिसांनी सहकार्य केलं आहे. मुख्यमंत्री साहेबांना आणि माध्यमांना मी वेळोवेळी सांगितलं, की मुख्यमंत्री माझ्यासाठी देव आहेत. त्यांची प्रतीमा मलीन होईल, असं कोणतही कृत्य मी केलेलं नाही आणि करणारही नाही. गैरवापर करुन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचं विजय माने यांनी म्हटलंय.

Video : विजय माने काय म्हणाले पाहा

कोण आहेत विजय माने?

विजय माने हे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांचे ड्युप्लिकेट म्हणून ओळखले जातात. त्यांच्या फेसबुक प्रोफाईलमध्ये त्यांनी आपण इंजिनिअर एमबीए असल्याचं म्हटलंय. शिवाय भारतीय जनता युवा मोर्चाचे ते सरचिटणीसही आहेत. पुण्यातील हवेली येथील ते रहिवासी असून आपण समाजसेवक आहोत, असंही ते म्हणाले आहेत.

नुकतीच विजय माने आणि एकनाथ शिंदे यांची भेटही झाली होती. त्यानंतर आता विजय माने यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडे वकील असीम सरोदे यांनी फेसबुकवर पोस्ट करत विजय माने यांच्यावरही आरोपांवरुन पोलिसांवर निशाणा साधलाय. विजय नंदकुमार माने हा एकनाथ शिंदे यांच्या सारखा दिसतो यामध्ये त्याचा काहीही दोष नाही, असं सरोदे यांनी म्हटलंय.

विजय नंदकुमार माने याच्यावर पुणे शहर गुन्हे शाखेने कलम 419 (फसवणूक), कलम 469 (खोटी, बनावट कागदपत्रे तयार करणे किंवा बनावट सह्या करून कागदपत्रे तयार करणे), कलम 500 (बदनामी, अब्रू नुकसानी) असे गुन्हे लावले आहेत.

प्रथमदर्शनी विजय माने यांच्यावर लावलेले आरोप चुकीचे वाटत आहेत, आम्ही याची माहिती घेणार आहोत, असं असीम सरोदे यांनी म्हटलंय. विजय माने याच्याविरुद्ध कारवाई प्रथमदर्शनी अत्यंत उत्साहाच्या भरात केलेली, चुकीची व बेकायदेशीर आहे, असं म्हणत त्यांना कायदेशीर मदतीची तयारीही दाखवलीय.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.