पिंपरीत 32 लाखांच्या बनावट नोटा जप्त, तर रावेरमध्येही खोट्या नोटा प्रकरणी चौघांना बेड्या

| Updated on: Jul 13, 2021 | 9:10 AM

निगडी परिसरातील ओटास्कीम येथून सुरु झालेली कारवाई पंढरपूर, सातारा, मुंबईमार्गे गुजरातपर्यंत गेली. महाराष्ट्रातून तीन, तर गुजरातमधूनही तिघा जणांना अटक करण्यात आली आहे.

पिंपरीत 32 लाखांच्या बनावट नोटा जप्त, तर रावेरमध्येही खोट्या नोटा प्रकरणी चौघांना बेड्या
Krishna Prakash
Follow us on

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात कारवाई करत पिंपरी चिंचवडमधील निगडी पोलिसांनी 32 लाख 67 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. तर मध्य प्रदेशातील बनावट नोट प्रकरणी जळगावातील रावेरमधून चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. ही दोन स्वतंत्र रॅकेट आहेत.

पिंपरीत बनावट नोटा, सहा जणांना अटक

पिंपरी चिंचवडमधील निगडी पोलिसांनी 32 लाख 67 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. निगडी परिसरातील ओटास्कीम येथून सुरु झालेली कारवाई पंढरपूर, सातारा, मुंबईमार्गे गुजरातपर्यंत गेली. महाराष्ट्रातून तीन, तर गुजरातमधूनही तिघा जणांना अटक करण्यात आली आहे.

मुंबईतून तिघे, गुजरातेतून तिघे गजाआड

गोरख दत्तात्रय पवार, विठ्ठल गजानन शेवाळे, जितेंद्र रंकनीधी पाणीग्रही, राजू उर्फ रणजीत सिंह खतुबा परमार, जितेंद्रकुमार नटवरभाई पटेल, किरण कुमार कांतीलाल पटेल अशी अटक केलेल्या सहा आरोपींची नावे आहेत.

रावेरमध्ये गावठी कट्ट्यासह चौघांना अटक

दुसरीकडे, मध्य प्रदेशातील बनावट नोटा प्रकरणी जळगावातील रावेरमध्ये नकली नोटा आणि गावठी कट्ट्यासह चौघा जणांना अटक झाली आहे. शंभर-दोनशे रुपयांच्या बनावट भारतीय चलनी नोटा रावेर शहरात आणून त्या संशयित आरोपी शेख शकीर शेख हाफिज याने अन्य चार संशयित आरोपींना चलनात वापरण्यासाठी दिल्या.

चौघांच्या झडतीत नकली नोटा सापडल्या

नोटा नकली असल्याची माहिती असूनही चौघांनी त्यातील काही नोटा चलनात आणून खर्च केल्या आहेत. पोलिसांनी घेतलेल्या चौघांच्या अंगझडतीत सात हजार रुपयांच्या नकली नोटा मिळाल्या. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात मध्यरात्री पाच जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यातील चौघांना अटक करण्यात आली आहे. यामुळे शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शहर आणि परिसरात किती प्रमाणात बोगस नोटांचा वापर करण्यात आला याबाबत चर्चा सुरु आहे.

संशयित आरोपी असलम उर्फ राजू सुपडू तडवी (वय 30), सोनू मदन हरदे (वय 30), रविंद्र राजाराम प्रजापति शेख शाकीर शेख साबीर (वय 26) शेख शकीर शेख हाफिज हे सर्व रावेर येथील रहिवाशी असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

जमिनीचा वाद टोकाला, सख्ख्या भावाकडून दुसऱ्या भावाची हत्या, इंदापूर हादरलं

भरदिवसा धारदार शस्त्राने सपासप वार, हत्याकांडाने पिंपरी चिंचवड हादरलं

(Fake Currency found in Pimpri Chinchwad and Madhya Pradesh Racket busted)