गोळीबाराच्या आरोपातून राष्ट्रवादीच्या माजी सरपंचाची मुक्तता, लोकांनी घातली दुधाने अंघोळ

गोळीबाराच्या आरोपातून मुक्तता झालेल्या बारामतीमधील राष्ट्रवादीच्या माजी संरपंचांना दुधाने अंघोळ घालण्यात आली आहे.

गोळीबाराच्या आरोपातून राष्ट्रवादीच्या माजी सरपंचाची मुक्तता, लोकांनी घातली दुधाने अंघोळ
MALEGAON SARPANCH
| Edited By: | Updated on: Aug 03, 2021 | 5:19 PM

पुणे : गोळीबाराच्या आरोपातून मुक्तता झालेल्या बारामतीमधील राष्ट्रवादीच्या माजी संरपंचाला (NCP Former sarpanch)  दुधाने अंघोळ घालण्यात आली आहे. या माजी सरपंचाचे नाव जयदीप तावरे असून ते माळेगाव या गावाचे सरपंच होते. पुण्याच्या मोक्का न्यायालायाने त्यांची मुक्तता केल्यानंतर ग्रामस्थ तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय. (Former NCP sarpanch in Baramati bathed in milk who was acquitted of firing charges)

रविराज तावरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता

मिळालेल्या माहितीनुसार 31 मे रोजी रविराज तावरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या पाच तासात चार आरोपींना अटक केले होते. मात्र, राजकीय आकसापोटी जयदीप तावरे यांच्यासह माळेगाव परिसरातील अनेकांची नावे यामध्ये गोवण्यात आली होती, असे सांगण्यात येतेय. जयदीप तावरे यांच्या अटकेनंतर ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला होता.

जयदीप तावरे यांची न्यायालयाने मुक्तता केली

पोलिसांनी याप्रकरणी जयदीप तावरे यांना अटक केल्यानंतर ग्रामस्थांनी गाव बंद केले होते. त्यानंतर आता जयदीप तावरे यांच्या अटकेनंतर पोलिसांनी मोक्का न्यायालयात कलम 169 नुसार रिपोर्ट सादर केला. ज्यामुळे जयदीप यांची मुक्तता करण्यात आली आहे. तावरे यांची मुक्तता केल्यामुळे माळेगवातील नागरिकांनी जल्लोष साजरा केलाय. लोकांनी जयदीप यांना दुधाने अंघोळ घातली आहे. या प्रकाराचे काही फोटो सोशल मीडियावर आले आहेत.

(Former NCP sarpanch in Baramati bathed in milk who was acquitted of firing charges)

इतर बातम्या :

पुणे महापालिकेचा राज्य सरकारला दणका, महानगर नियोजन समितीला उच्च न्यायालयाकडून स्थगिती

‘पोलिसांनी मला सोडण्यासाठी 10 हजार घेतले, मारहाण करणारी तरुणी पोलिसांची खबरी’, कॅब ड्रायव्हरचा गंभीर आरोप

संजय राऊत आणि राहुल गांधींची जवळीक वाढतेय?; पाहा हा फोटो काय सांगतो!